धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट! परतीच्या पावसाबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट
मान्सूनचा पाऊस दिवाळीतही पडणार? हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज काय सांगतो?
पुणे : राज्यात अजूनही पावसाची (Maharashtra Rain Update) हजेरी अनेक भागात पाहायला मिळतेय. पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) बहुतांश जिल्ह्यांना ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलंय. पु्ण्यात तर गुरुवारीही पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. दरम्यान मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain News) परतीचा मार्ग धरण्यासाठी पुढचे आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. ह
वमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस 10 दिवसांनी लांबलाय. दरवर्षीत 4 ते 5 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा परतीच्या पावसाची वेळ लांबलीय. त्यामुळे ऐन दिवाळीतही पाऊस पडणार की काय, अशी भीतीही व्यक्त केली जातेय. लांबलेल्या पावसामुळे शेतीलाही फटका बसलाय.
परतीचा पाऊस लांबला
राज्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावली आहे. ऑक्टोबर महिना उजाडला तरी पावसाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे यासह मराठवाड्यातील जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रतही पावसाने हजेरी लावलीय.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह पूर्व भारताच्या भागातून परतीच्या पावासाचा प्रवास सुरु होईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जोर कमी होणार?
15 ऑक्टोबरपासून पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांमधील पावसाचा प्रभाव कमी होईल. मात्र तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, अशी शक्यताही वर्तवली जातेय.
गेल्या चार ते पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पाऊस अनेकांना धडकी भरवणारा होता. या पावसाचा जोर फारसा नसला, तरी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने अनेकजण धास्तावले होते.
राज्यात वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. दरम्यान, येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होत जाऊन परतीच्या पावसाचा प्रवास सुरु होतो का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.