मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रक-ट्रेलरचा अपघात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

मुबंई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात झाला (Truck-Trailer Accident). यामध्ये दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रक-ट्रेलरचा अपघात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी
Raigad Accident Fire
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 7:45 AM

रायगड : मुबंई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात झाला (Truck-Trailer Accident). यामध्ये दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. केमीकल ड्रम भरलेल्या ट्रकमुळे दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी गेली. पुण्याकडे जाताना बोरघाटाच्या सुरुवातीला हा झाला अपघात (Truck-Trailer Accident In Mumbai-Pune Express Way).

या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक थाबंवली काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र, पहाटेच्या सुमारास मुबंई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन्ही मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु करण्यात आली आहे.

ट्रकमधील ड्रम गरम होऊन ब्लास्ट झाल्याने ही आग आणखीनच वाढले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचण येत होती. घटनास्थळी बोरघाट वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, आयआरबी यत्रंणा, पेट्रोलिंग टीम, खोपोली नपा अग्निशमन दल, उत्तम स्टील अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम पोहोचली. त्यानंतर बऱ्याच शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियत्रण मिळवण्यात यश आलं.

एक्सप्रेस-वेवर रात्रीच्या सुमारास आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट उठले होते. या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग अटोक्यात आली मात्र अद्याप विझलेली नाही.

एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका

खालापूरजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिली. बुधवारी (3 मार्च) मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा अपघात घडला. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पंक्चर काढण्यासाठी ट्रक उभा होता. या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला.

अपघातात पुढच्या ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला, तर मागील ट्रकमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर काही दिवसांपूर्वीच विचित्र अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. टेम्पो, ट्रेलर, कारसह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता.

पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाट उतरताना फूडमॉलजवळ हा अपघात झाला होता. या अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Truck-Trailer Accident In Mumbai-Pune Express Way

संबंधित बातम्या :

Photos : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 60 फुट दरीत बस कोसळणार तोच….

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर क्वालिस कंटेनरला धडकली, तरुणाचा मृत्यू, चालक जखमी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.