Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरुद्ध उमेदवार आक्रमक, रखडलेल्या नियुक्त्या करण्याची मागणी

19 जून 2020 ला एमपीएससीतर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला होता. (MPSC Candidates Appointment Pending )

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरुद्ध उमेदवार आक्रमक, रखडलेल्या नियुक्त्या करण्याची मागणी
एमपीएसी
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 7:27 PM

पुणे: राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकल्यामुळे चर्चेत आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरुद्ध विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा अंतिम परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करुन 8 महिन्यांचा कालावधी होत आला आहे. अद्यापही विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र दिली नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पुण्यामध्ये शनिवारी 13 मार्चला नियुक्त्या रखडलेले 413 उमेदवार एकत्र येणार आहेत. (Maharashtra Public Service Commission pending appointments of candidates from eight months)

जून 2020 ला निकाल जाहीर

19 जून 2020 ला एमपीएससीचा निकाल लागून अजूनही उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत. एमपीएससीनं 413 जागांसाठी ती परीक्षा घेतली होती. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधिक्षक , प्रांताधिकारी पदावर निवड होऊन अजूनही विद्यार्थ्यांना नियुक्त्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले असून त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जून 2020 ला राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला होता. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या उमेदवारांनी पत्र लिहीलं आहे. नियुक्त्या देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

अभ्यास करून परीक्षा पास होऊनही नियुक्त्या नाहीत मुंबई उच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं राज्य सरकाराला 9 डिसेंबर 2020 रोजी नियुक्त्या करण्यापासून कोणीही रोखलेले नाही, असा आदेश दिल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. सर्वसमावेशक विचार करुन तात्काळ नियुक्त्या द्याव्या, अशी विनंती उमेदवारांनी केली आहे. उद्या 413 नियुक्त्या रखडलेले उमेदवार पुण्यात एकत्र येणार आहेत.

संबंधित बातम्या: 

MPSC आंदोलन : पुण्यात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्र्यांच्या संवादावर MPSCचे विद्यार्थी नेमकं काय म्हणतायत?

Maharashtra Public Service Commission pending appointments of candidates from eight months

बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...