बारामतीच्या 64 वर्षीय ‘तरुणा’ची कमाल, ‘आर्यन मॅन’ किताब पटकावणारा सर्वाधिक वयाचा भारतीय

जर्मनीतील हॅमबर्ग येथे 29 ऑगस्ट रोजी झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत मूळ पुण्यातील बारामतीचे असलेल्या दशरथ जाधव यांनी सहभाग घेतला होता. सर्वाधिक वयाचे भारतीय आर्यन मॅन होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे

बारामतीच्या 64 वर्षीय 'तरुणा'ची कमाल, 'आर्यन मॅन' किताब पटकावणारा सर्वाधिक वयाचा भारतीय
दशरथ जाधव
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 12:48 PM

बारामती : पुण्याच्या दशरथ जाधव (Dashrath Jadhav) यांनी वयाच्या 64 व्या वर्षी ‘आर्यन मॅन’ (Iron Man) स्पर्धा पूर्ण केली. सलग चार वर्ष त्यांनी ‘आर्यन मॅन’ हा किताब पटकावला आहे. सर्वात वयोवृद्ध भारतीय आर्यन मॅन बनण्याचा मान दशरथ जाधव यांनी मिळवला आहे. अभिनेता मिलिंद सोमण, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यासारख्या सेलिब्रिटींनी हा किताब पटकावल्यानंतर भारतात सर्वसामान्यांनाही या स्पर्धेविषयी रस निर्माण झाला होता.

नुकत्याच, जर्मनीतील हॅमबर्ग येथे 29 ऑगस्ट रोजी झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत मूळ पुण्यातील बारामतीचे असलेल्या दशरथ जाधव यांनी सहभाग घेतला होता. सर्वाधिक वयाचे भारतीय आर्यन मॅन होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. जाधव यांनी वयाच्या 64 वर्षी आर्यन मॅन स्पर्धा जिंकत हा विक्रम रचला आहे. साठी पार केल्यानंतर सलग चार वर्ष ते आर्यन मॅन स्पर्धा पूर्ण करुन हा किताब मिळवत आहेत.

वय म्हणजे फक्त आकडे

16 तासाची ही स्पर्धा त्यांनी 14 तास 12 मिनिटांत पूर्ण करत तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. वयाच्या 64 व्या वर्षीही आपल्या 27 वर्षांच्या तरुणाची ऊर्जा, उत्साह आणि चैतन्य असल्याच्या भावना त्यांनी स्पर्धा जिंकल्यानंतर व्यक्त केल्या होत्या.

काय असते आयर्न मॅनचे आव्हान

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे. यात 4 किमी पोहणे, 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.2 किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. हा संपूर्ण जगात एक सर्वात कठीण एक दिवसीय आव्हानात्मक उपक्रम आहे.

नाशिकच्या अनिकेत झवरलाही किताब

नाशिकच्या अनिकेत झवर या तरुणानेही जर्मनीत झालेल्या आयन मॅन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. अत्यंत मानाच्या आणि तितक्याच कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतापेक्षा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही स्पर्धा पूर्ण करणं एक मोठं आव्हान असतं. ही स्पर्धा पूर्ण करण्याचं चॅलेंज अनिकेत झवरने 14 तास 35 मिनिटात पूर्ण करत आयर्न मॅन किताब पटकावला.

नाशिकमध्ये ढोल ताशांच्या गजरात अनिकेतचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी देखील आयर्न मॅनचा किताब यापूर्वी पटकावला आहे.

संबंधित बातम्या :

‘फिटनेस किंग’ मिलिंद सोमण 56 व्या वर्षाीही फिट अँड फाईन!

‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.