पुणे महापालिका सिरमची लस खरेदी करणार, महापौरांची माहिती; पुनावाला पुण्याला लस देणार?

| Updated on: Apr 27, 2021 | 3:29 PM

पुणे महापालिका कोविशील्ड लसींची थेट खरेदी करणार आहे. Pune Municipal Corporation Serum Institute

पुणे महापालिका सिरमची लस खरेदी करणार, महापौरांची माहिती; पुनावाला पुण्याला लस देणार?
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us on

पुणे: महाराष्ट्र सध्य कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका पुणे शहराला बसला आहे. पुणे शहराचा देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या शहरांमध्ये समावेश आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सिरमच्या आदर पुनावालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पुणे महापालिका कोविशील्ड लसींची थेट खरेदी करणार आहे.( Maharashtra Pune Municipal Corporation will buy corona vaccine from Serum Institute said by Mayor Murlidhar Mohol)

महापौरांनी पुनावालांच्या भेटीची वेळ मागितली

पुणे महापालिका करणार लसींची थेट खरेदी करणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांकडे लसीचे 10 लाख डोस देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुनावालांच्या भेटीसाठी मागितली वेळ आहे.

पुनावाला पुण्याला थेट लसीची विक्री करणार का ?

भारत सरकारकडून कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या लसीची खरेदी करण्यात येत आहे. 20 मे पर्यंत सिरमचा पुरवठा केंद्र सरकारला होणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारनं ही सिरमला लसीबाबत पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आदर पुनावाला पुणे महापालिकेला लस देणार का? हा प्रश्न आहे. पुण्यात लसीचं उत्पादन होत असल्यानं महापालिकेला लसीचे डोस मिळण्याची आशा आहे.

पुणे महापालिकेकडून 19 दिवसात 25 लाखांचा दंड वसूल

कोरोना विषयक लावण्यात आलेले निर्बंध मोडणाऱ्या पुणेकरांना महापालिकेने 19 दिवसांत 25 लाख 76 हजार 870 रुपयांचा दंड ठोठावला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई करण्यात आली.सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे अशा कारणांमुळे दंड ठोठावण्यात आलाय. कडक निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असली तरी किराणा दुकाने, भाजी, फळ विक्री दुकानांत शिस्तीचे पालन केले जात नाही. तसेच सोसायट्यांचे परिसरात नागरिक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे असे बेशिस्त वर्तन सुरुच आहे. मास्क न घातल्यास 500 रुपये तर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने 1 हजार रुपयांचा दंड केला जात आहे. पालिकेने निर्बंध आणल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत 22 एप्रिल पर्यंत 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलीय.

संबंधित बातम्या:

पुण्यात आतापर्यंत एकट्या ससूनमध्येच अडीच हजार रुग्णांचा मृत्यू; वाचा, कारण काय?

पुण्यात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागाच नाही; आता मोकळ्या मैदानांवर होणार अंत्यसंस्कार

( Maharashtra Pune Municipal Corporation will buy corona vaccine from Serum Institute said by Mayor Murlidhar Mohol)