पुणे : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन न मिळाल्याने 24 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यानंतर आता पुण्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तशी माहिती पुणे आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिलीय. ऑक्सिजनचा साठा संपत आल्यामुळे अनेक छोट्या रुग्णालयांनी नव्या रुग्णांना प्रवेश देणं बंद केलं आहे. त्यामुळे रुग्णांचीही मोठी परवड होत आहे. रुग्णांचा नातेवाईकांचा रोष ओढावला जाऊ नये म्हणून लहान रुग्णालयांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Oxygen shortage in Pune city hospitals)
ऑक्सिजनचा पुरेसा साठाच नसल्यामुळे छोट्या रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी केली आहे. पुणे शहरातील 40 पेक्षा अधिक रुग्णालयांनी ही भूमिका घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्यानं अनेक रुग्णालय प्रशासन हतबल झाल्याचं चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नाशिकमधील दुर्घटनेनंतर पुण्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन यंत्रणेचे फायर ऑडिटच्या धर्तीवर ऑडिट करण्यातचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. “पुणे शहरातील सर्व हॉस्पिटलच्या ऑक्सिजन यंत्रणेचे ‘फायर ऑडिट’च्या धर्तीवर तातडीने ऑडिट करण्याचे आदेश आज पुणे महानगरपालिका प्रशासनाला बैठक घेऊन दिले आहेत. शिवाय या संदर्भात तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या आहेत”, असं ट्वीट करुन महापौरांनी ही माहिती दिलीय.
पुणे शहरातील सर्व हॉस्पिटलच्या ऑक्सिजन यंत्रणेचे ‘फायर ऑडिट’च्या धर्तीवर तातडीने ऑडिट करण्याचे आदेश आज पुणे महानगरपालिका प्रशासनाला बैठक घेऊन दिले आहेत. शिवाय या संदर्भात तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 21, 2021
पुणे शहरात काल दिवसभरात 5 हजार 138 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 6 हजार 802 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या 52 हजार 977 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 1 हजार 277 जणांची प्रकृती गंभीर आहे.
कालच्या आकडेवारीनुसार पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 962 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 17 हजार 767 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार २० एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ५२,९७७
◆ नवे रुग्ण : ५,१३८ (३,७६,९६२)
◆ डिस्चार्ज : ६,८०२ (३,१७,७६७)
◆ चाचण्या : २०,२०४ (१९,२१,८२८)
◆ मृत्यू : ५५ (६,२१८)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/EZYFPXf4mY— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 20, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO : नाशिकमधील दुर्घटना नेमकी का घडली? नेमकं काय चुकलं? आरोग्यमंत्र्यांकडून सविस्तर माहिती
Oxygen shortage in Pune city hospitals