पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका सुरु आहेत. पुण्यात तर गणपती विसर्जनाच्या मिरवणुका खास असतात. पुण्यातील अल्का चौकात (Alka Talkies Chowk) सगळ्या गणेश मूर्ती येत असतात. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अल्का टॉकिज चौकात गणेशभक्त गर्दी करतात. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati) विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल झाली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.