Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे 20 बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत आहे. (Maharashtra State Mucormycosis Patients)

Mucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे 20 बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 11:43 AM

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (mucormycosis) या आजाराचे संकट दिवसेंदिवस धोका वाढत आहे. कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी राज्यातील अनेक शहरात याचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासन सावध झाले आहे.  (Maharashtra State Mucormycosis Patients)

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ची लक्षणे दिसत आहे. यातील अनेक जण हे कोरोना आजारातून बरे झालेले आहे. पण कोरोनापश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामुळे रुग्णाच्या वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्यावर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये काळसर अशी बुरशी तयार होते. ही म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे रुग्णांमधील धोका वाढत आहे.

राज्यात कुठे, किती म्युकोरमायकोसिसचे रुग्ण?

?पुण्यात म्युकोरमायकोसिसमुळे 20 जणांचा बळी

पुणे जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी गेला आहे. पुण्यात एकूण 353  म्युकोरमायकोसिस रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर हद्दीत आतापर्यंत 11 मृत्यू झाले आहेत. सुदैवाने 212 रुग्ण म्युकोरमायकोसिस मधून बाहेर पडले आहेत. तर पुण्यात सद्यस्थितीत 115 जणांवर उपचार सुरु आहेत.

?वर्ध्यात 34 म्युकोरमायकोसिसचे रुग्ण

नागपूर,अमरावती, चंद्रपूरनंतर वर्ध्यातही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 34 रुग्ण आढळले आहे. यापैकी 13 रुग्ण सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात  भरती असून  8 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात एवढया मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

?सांगलीत 61 जणांना म्युकोरमायकोसिस

सांगली जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकोरमायकोसिस या आजाराची साथ पाहायला मिळत आहे. यातील 61 जणांना म्युकोरमायकोसिस आजार झाला आहे.यातील 43 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

?जालन्यात 33 रुग्ण म्युकोरमायकोसिसची लागण

जालना जिल्हयात कोरोनासोबत आता म्युकोरमायकोसिसने शिरकाव केला आहे. जास्त काळ व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना म्युकोरमायकोसिसची लागण झाली आहे. जालन्यात सध्या म्युकोरमायकोसिसचे तब्बल 33 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 12 जण या म्युकरमायकोसिस आजारातून मुक्त झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

?नागपूरमध्ये 53 रुग्णांची नोंद 

नागपुरातही म्युकोरमायकोसिसचा धोका वाढत आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 53 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 18 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे.

?नांदेडमध्ये म्युकोरमायकोसिसचे 92 रुग्ण 

नांदेडमध्ये म्युकोरमायकोसिस या आजाराचे 92 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 16 जण दगावले आहेत. विशेष म्हणजे 50 जण या आजारातून उपचार घेऊन ठणठणीत बरे झाले आहेत. नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांचा यात समावेश आहे.

?अहमदनगरमध्ये म्युकोरमायकोसिसचे 61 रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या तब्बल 61 रुग्णांवर उपचार आहेत. यासाठी लागणाऱ्या औषधांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. हे इंजेक्शन शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी हाल होत आहे.

?म्युकोरमायकोसिस म्हणजे काय??

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे. (Maharashtra State Mucormycosis Patients)

संबंधित बातम्या :

सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....