भाजपला मस्ती आलीय…दोन आमदार पळवल्याने महादेव जानकर यांचं तांडव

Mahadev Jankar Attack on BJP : आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? महादेव जानकर यांनी अचानक असा यूटर्न कसा घेतला? भाजपाच्या गळ्यातील ताईत असलेले जानकर अचानक मित्रावरच कसे काय भडकले? त्यांनी थेट भाजपाची मस्तीच काढली आहे. दोन आमदार पळवण्याचे हे प्रकरण आहे तरी काय?

भाजपला मस्ती आलीय...दोन आमदार पळवल्याने महादेव जानकर यांचं तांडव
महादेव जानकर
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 2:47 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची चूल सध्या महायुतीच्या वाड्यात आहे. महायुतीने लोकसभेला अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना परभणीची जागा सोडली होती. पण आता त्यांनी अचानक 360 डिग्री वळसा घेत भाजपावरच टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महादेव जानकर यांनी अचानक असा यूटर्न कसा घेतला? भाजपाच्या गळ्यातील ताईत असलेले जानकर अचानक मित्रावरच कसे काय भडकले? त्यांनी थेट भाजपाची मस्तीच काढली आहे. दोन आमदार पळवण्याचे हे प्रकरण आहे तरी काय?

मी स्वत:च्या चिन्हावर लढलो

बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथे त्यांचे भाषण चांगलेच गाजले. त्यांनी मित्रपक्षाला फटकावलेच पण पवारांच्या घराणेशाहीवर पण चिमटे काढले. बारामती मला नवीन नाही मी बारामतीला यासाठी आलो आहे मी खासदारकीचा पडीक उमेदवार आहे पाच वेळा मी खासदारकी लढवली आहे आमदारकी कधीच लढवली नाही, महाराष्ट्रात 288 जागा उभा केल्या. कार्यकर्ते म्हणायला लागले ही ती करायची नाही. मी खासदार मंत्री झालो ते आपल्या चिन्हावर झालो मी दुसऱ्यांच्या चिन्हावर झालो नाही. मी जर घोटाळा केला असता चोऱ्या केल्या असत्या तर माझ्याही मागे ईडी लावली असती मला म्हणले असते तुम्हाला आमच्याबरोबर राहावं लागेल नाहीतर तो आत तुरुंगात टाकू, असे जोरदार भाषण त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

मी माझा स्वाभिमान जपला

काहीजण म्हणायचे महादेव जानकर असं काही खरं नाही पण महादेव जानकर बोलतो सांगतो तो पाळतो. मी चाळीस वर्षांपूर्वी सांगीतलं होतं एक दिवस पंतप्रधान होईल मी आज माझी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे भाषण करत आहे तोही मा‍झ्या पक्षातून करत आहे. त्यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारलं. आम्हाला बोलवलं नाही जेवायला तर जायचं कशाला आम्ही स्वाभिमानी माणस आहोत, असे जानकर म्हणाले.

भाजपावर तिखट प्रतिक्रिया

भाजपाची मस्ती वाढली आहे. त्यांनी काय केलं शिवसेना फोडली. राष्ट्रवादी फोडली. कुठला माणूस कुठ ठेवाला नाही. आमचे एक दोन आमदार होते ते आमदार पण आमचे पळवले. आमचा आमदार निवडून येतो आमच्या पक्षावर आणि तुम्ही भाजप बरोबर घेऊन जाता, असा खरमरीत सवाल त्यांनी केला. आपल्याच मित्रपक्षाला जानकरांनी खरी-खोटी सुनावली. तर देवकाते आणि कोकरे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त महादेव जानकरच आमदार करू शकतो, असा दावा केला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.