मी पवारसाहेबांना सोडलेलं नाही, तर…; बारामतीत बोलताना अजितदादांची भावनिक साद

Ajit Pawar on Vidhansabha Election 2024 : अजित पवार सध्या बारामतीतील विविध भागात जात आहेत. तिथल्या लोकांशी अजित पवार संवाद साधत आहेत. या गावभेट दौऱ्या दरम्यान अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर......

मी पवारसाहेबांना सोडलेलं नाही, तर...; बारामतीत बोलताना अजितदादांची भावनिक साद
अजित पवार, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 10:33 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार आज गावभेट दौरा करीत आहेत. बारामतीमधील ढाकाळे इथं भेट देऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात झालीय. बारामतीमधील ढाकाळे, माळेगाव खुर्द आणि कऱ्हावागज या गावांचा अजित पवार गावभेट दौरा करणार आहेत. गावभेट दौऱ्या दरम्यान अजित पवार हे नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन करत आहेत. बारामतीतील माळेगावमध्ये बोलताना अजित पवांरांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. लोकांना वाटत होतं की मी शरद पवार साहेबांना मी सोडायला नको होतं. परंतु मी साहेबांना सोडलं नाही. सर्व आमदारांच्या सह्या होत्या, असं अजित पवार म्हणाले.

मतदारांना अजित पवारांची साद

माळेगावमधील काही पुढारी चुकीचं काम करतायेत. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायचं असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो. त्यावेळी याठिकाणी काय होतं, कुसळं यायची. आता काय परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या. साहेबांचा आदर राखून ताईंना साथ दिली. आता मला साथ द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत. ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे. पुढच्या पिढीसाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा. मी न मागता सगळं करतोय. याची तुम्हाला किंमत कळत नाही. मी कॅनॉलचं पाणी आणलं नसतं, तर ऊसाचं पाचट झाली असती. विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे.. पवार साहेबांनी रिटायर झाले मग बारामती कडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांला साथ दिली. आता मला साथ द्या, अजित पवार माळेगावमध्ये बोलताना म्हणाले.

अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द

पुरंदर उपसा सिंचन योजना सोमेश्वर कारखान्याला चालविण्यासाठी देणार आहे. ज्यास्तीत ज्यास्त सौरऊर्जा वापरण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. पुरंदर सिंचन योजनेला कायमस्वरूपी पाणी राहणार आहे. बारामती तालुक्यातील जिरायत शब्द भविष्यात कायमस्वरूपी काढून टाकणार आहे, असा शब्द अजित पवारांनी बारामतीकरांना दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.