देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्याला एका दिवसात बेड्या!, उपमुख्यमंत्री अजिदादांनी शब्द पाळला
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात यूट्युबवर आक्षेपार्ह बदमानी करणारा मजकूर टाकणाऱ्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकत आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे
पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात यूट्युबवर आक्षेपार्ह बदमानी करणारा मजकूर टाकणाऱ्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकत आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. पुण्यातील थेरगावातल्या जगतापनगर इथं हा प्रकार घडला होता. महत्वाची बाब म्हणजे हा मुद्दा विधानसभेत उचलला गेला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कारवाईचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार अजितदादांनी दिलेला शब्द पुणे पोलिसांनी खरा करुन दाखवला आहे.(Man arrested for defaming Devendra Fadnavis on YouTube, Ajit Pawar’s promise comes true)
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, बदनामी करणारा आणि अश्लील मजकूर असलेलं वक्तव्य केलेला एक व्हिडीओ आरोपीने यूट्युबवर अपलोड केला होता. त्याबाबत आरोपीकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा दाखले नव्हते. तरीही त्याने फडणवीसांची बदनामी करणाचा व्हिडीओ प्रसारित केला. याबाबत एका 37 वर्षीय महिलेनं फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन आरोही युवराज दाखलेला अटक केली आहे. हा आरोपी काळेवाडीतील तापकीरनगरचा रहिवासी आहे.
एका दिवसात आरोपीला बेड्या
फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा व्हिडीओ पाहून फिर्यादी आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. तसंच त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 294 आणि 500 नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाडक पोलिसांनी या प्रकाराचा तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
विधानसभेत मुद्दा गाजला
फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपचे आमदारही चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे नाना पटोले यांनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला. फडणवीस यांनीही विधानसभेत बोलताना या आक्षेपार्ह यूट्युब व्हिडीओवरुन राज्य सरकारला चांगलच लक्ष्य केलं.
अजितदादांचा शब्द खरा ठरला
त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईचं आश्वासन दिलं. इतकच नाही तर त्याला आजच अटक केली जाईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. त्यानंतर अजितदादांनी दिलेल्या शब्दानुसार त्या व्यक्तीला वाडक पोलिसांनी आजच अटक केली. त्यामुळे अजितदादांचा शब्द खरा ठरल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकते स्वस्त, SBI ने सांगितली ‘आयडिया’#PetrolDieselPrice #SBIEconomist #PetrolPrice #PetrolDieselPriceHike https://t.co/QySO64SmPy
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या :
Man arrested for defaming Devendra Fadnavis on YouTube, Ajit Pawar’s promise comes true