Pune accident : भरधाव दुचाकी खांबाला आदळली, हेल्मेट नसलेला दुचाकीस्वार गतप्राण; पुण्याच्या मांजरीतली दुर्दैवी घटना

शहरात हेल्मेटविना दुचाकी चालवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालावे हे अशा दुचाकीस्वारांना समजत नाही. हे खेदजनक आहे. अपघातग्रस्ताने हेल्मेट घातले असते तर कदाचित तो अपघातातून वाचला असता, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.

Pune accident : भरधाव दुचाकी खांबाला आदळली, हेल्मेट नसलेला दुचाकीस्वार गतप्राण; पुण्याच्या मांजरीतली दुर्दैवी घटना
माळशेज घाटातील अपघातग्रस्तांना मिळणार उपचारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:39 AM

पुणे : दुचाकी विजेच्या खांबाला धडकून (Two wheeler collided with a pole) झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच मृत्यू झाला आहे. हडपसर येथील मांजरी रोडवर सोमवारी रात्री 42 वर्षीय मोटारसायकलस्वाराचे वाहन रस्त्यावरून घसरून विजेच्या खांबाला धडकले. त्यानंतर डोक्याला गंभीर दुखापत (Seriously injured) झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आबा भानुदास घाडगे (वय 42, रा. मांजरी बुद्रुक) असे मृताचे नाव आहे. घाडगे त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते. भरधाव वेगाने ते दुचाकी चालवत असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यातच त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावरून घसरले आणि थेट विजेच्या खांबाला धडकले. त्यामुळे त्याचा चेहरा आणि डोक्याला जबर मार लागला, असे उपनिरीक्षक कविराज पाटील यांनी मंगळवारी सांगितले. त्यांनी हेल्मेट (Helmet) घातलेले नव्हते, असेही निदर्शनास आले आहे.

रुग्णालयात दाखल केले, पण…

पाटील म्हणाले, की कचरा टाकण्यासाठी निघालेल्या संकेत रावखडे (42) आणि त्यांच्या चुलत भावाला मांजरी रस्त्यावरील इंधन केंद्राजवळ मोटारसायकल घसरून विजेच्या खांबाला धडकताना दिसली. व्यक्तीच्या नाक आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. पोलीस सूत्रांनी सांगितले, की रावखडे आणि इतरांनी गंभीर जखमी घाडगे यांना तातडीने ससून सामान्य रुग्णालयात दाखल केले. ससूनच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अपघाताचे साक्षीदार रावखडे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधारकार्ड सापडल्यानंतर त्याची ओळख पटवता येईल.

एफआयआर दाखल

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, भारतीय दंड संहिता आणि मोटारच्या कलम 279 आणि 304 (A) अन्वये निष्काळजीपणाने वाहन चालवल्याबद्दल आणि निष्काळजीपणामुळे स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संबंधित व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे, असे पाटील पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘…तर कठोर कारवाई करावी’

शहरात हेल्मेटविना दुचाकी चालवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालावे हे अशा दुचाकीस्वारांना समजत नाही. हे खेदजनक आहे. अपघातग्रस्ताने हेल्मेट घातले असते तर कदाचित तो अपघातातून वाचला असता, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती परिसरातील आणखी एका रहिवाशाने केली. त्यामुळे शहरातील जीवघेणे अपघात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. गरज भासल्यास पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हेल्मेट नसलेल्या दुचाकी, स्कूटर चालवणाऱ्यांच्या दंडात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.