संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून फसवणूक; मनोहरमामाला पाच दिवसाची कोठडी

संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Manoharmama Bhosale)

संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून फसवणूक; मनोहरमामाला पाच दिवसाची कोठडी
मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 3:08 PM

बारामती: संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बारामती न्यायालयाने मनोहरमामाला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Manohar mama bhosale send police custody till 16th september)

बारामती सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मनोहरमामाचा गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम राहणार आहे. त्याच्यावर फसवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होते. त्यामुळे बारामती पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी सत्र न्यायालयात हजर केले असता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कर्करोग बरा करण्याच्या नावाने अडीच लाख उकळले

शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) या 23 वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली होती. 20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांचा थायरॉईड आणि कर्करोग बरा करतो, असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान मनोहर भोसले विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतली आहे. फसवणूक प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

रो हाऊस बळकावला

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर. त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती. (Manohar mama bhosale send police custody till 16th september)

संबंधित बातम्या:

बलात्काराच्या 4 घटनांनी महाराष्ट्र हादरला, पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार, अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Saki Naka rape : आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; राऊत म्हणतात, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

(Manohar mama bhosale send police custody till 16th september)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.