Pune | सर्वात महत्त्वाची बातमी! पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द

पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या काही गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाकडून याबाबत परिपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांनी याबाबत नोंद घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Pune | सर्वात महत्त्वाची बातमी! पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 10:47 PM

पुणे | 18 ऑगस्ट 2023 : पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या एकूण 12 रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या 12 गाड्या तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या 12 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव, डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्यादेखील रविवारी धावणार नाहीत. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने अनेक जण मुंबईहून पुण्याला जातात किंवा पुण्याहून मुंबईत प्रवास करुन येतात. या दोन दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अशा परिस्थितीत आता अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

पुणे अप मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत

पुणे – लोणावळा (वेळ 7.15) पुणे – तळेगांव (वेळ 7.38) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 8.50) पुणे – तळेगांव (वेळ 9.43) पुणे – लोणावळा (वेळ 10.42) पुणे – लोणावळा (वेळ 12.02 पुणे – लोणावळा (वेळ 15.45) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 15.57) पुणे – तळेगांव (वेळ 16.32) कोयना एक्सप्रेस (वेळ 16.42) पुणे – लोणावळा (वेळ 17.10) शिवाजीनगर – लोणावळा (वेळ 17.56)

पुणे डाऊन मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत

लोणावळा – शिवाजीनगर (वेळ६.५६) तळेगांव – पुणे (वेळ 7.48) लोणावळा – पुणे (वेळ 7.53) लोणावळा – पुणे (वेळ 8.46) तळेगांव – पुणे (वेळ 9.57) डेक्कन एक्सप्रेस (वेळ 10.10) लोणावळा – शिवाजीनगर (वेळ 10.31) कोयना एक्सप्रेस (वेळ 11.35) लोणावळा – पुणे (वेळ 15.16) तळेगांव-पुणे (वेळ 16.40) लोणावळा – पुणे (वेळ 19.25)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.