Pune Maratha Kranti Morcha : ‘तेढ निर्माण करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेला फिरू देता कामा नये’, पुण्यात मराठा समाज आक्रमक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनबाहेर मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली. जातीजातीत तेढ निर्माण केली, मराठा आरक्षणाविरोधात काम करतो, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध करत असल्याचे यावेळी आंदोलक म्हणाले.

Pune Maratha Kranti Morcha : 'तेढ निर्माण करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेला फिरू देता कामा नये', पुण्यात मराठा समाज आक्रमक
गुणरत्न सदावर्तेंविरोधात आक्रमक मराठा आंदोलकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 1:35 PM

पुणे : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाले. सदावर्ते यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस (Notice) बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी मराठा आंदोलक (Maratha) आक्रमक झाले. त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांत हजेरी लावणे बंधनकारक आहे, त्याप्रमाणे कालही ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. आपली मुस्कटदाबी सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आज ते पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी आले असता मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

मराठा समाज आक्रमक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनबाहेर मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली. जातीजातीत तेढ निर्माण केली, मराठा आरक्षणाविरोधात काम करतो, छत्रपतींच्या वंशजांचा, छत्रपतींच्या गादीचा अवमान करण्याचा अधिकार त्याला कोणी दिला? एवढे असूनही तो उजळ माथ्याने इथे येतो, त्याला महाराष्ट्रात फिरू देता कामा नये, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध करत असल्याचे यावेळी आंदोलक म्हणाले.

काय आहे वाद?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यावेळी निषेध करण्यात आला होता. सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. तर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशा संतापजनक प्रतिक्रियाही आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांतीतर्फे आंदोलन करण्यात आले.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.