शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे

शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.

शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 5:09 PM

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय. (Sambhajiraje Chhatrapati meeting with Prakash Ambedkar on Maratha reservation)

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. भेट घेण्यामागे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील, हे कारण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

राजकीय पक्षांना मराठ्यांना आरक्षण देण्यात रस नव्हता – आंबेडकर

संभाजीराजेंनी जो मराठा आरक्षमाचा विषय घेतला आहे, त्याला राजकीय पक्षांमध्ये रस नव्हता. आरक्षणाच्या मुद्यावरुन बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस वर्किंग कमिटीने मान्य केल्यानंतर बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता. आरक्षण हे समाजाला व्यवस्थेशी जोडणारा एक भाग आहे. आता प्रशासनाशीही जोडण्याचं प्रिन्सिपल आहे. मात्र ते मान्य करायला तयार नाही, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

‘राज्यसत्तेच्या माध्यमातून कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो’

पहिली घटना दुरुस्ती झाली ती आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच झाली. ही घटनादुरुस्ती बाबासाहेबांनी केली त्यावेळचं भाषण महत्त्वाचं होतं. येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा त्रासदायक ठरणार आहे, हा मुद्दा इतकं डोकं वर काढेल की राज्यसत्ता चालवायलाच कठीण होईल, अशी परिस्थिती आहे, असंही आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणासाठी रिव्हू पिटीशन नाही, तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत रिव्ह्यू करता येईल. म्हणूनच राज्यसत्तेची गरज आहे. राज्यसत्ता असेल तर आपण राज्यपालांमार्फत रिव्हू मागू शकतो आणि कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो. हा एक मार्ग मला दिसत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.

‘राज्यसत्तेसाठी संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा’

आताच्या परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामध्ये दोन मार्ग आहे. एक म्हणजे रिव्हूय पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत. तेव्हा राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असं मतही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली; मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला!

त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही?; कोळसे-पाटलांचा सवाल

Sambhajiraje Chhatrapati meeting with Prakash Ambedkar on Maratha reservation

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.