‘थर्टी फस्ट’ला झिंगत नाचू नका, छेड काढली तर याद राखा, पोलिसांची करडी नजर

| Updated on: Dec 31, 2023 | 12:45 PM

happy new year 2024 | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्यातील नागरिक सज्ज आहे. यावेळी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार आहे.

थर्टी फस्टला झिंगत नाचू नका, छेड काढली तर याद राखा, पोलिसांची करडी नजर
Follow us on

अभिजित पोते, पुणे, मनोज लेले, रत्नागिरी, दि. 31 डिसेंबर 2023 | थर्टी फस्टला झिंगत नाचू नका, मुलींची छेड काढली तर याद राखा, मद्यपान करुन गाडी चालवू नका, कारण पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे. नियम मोडल्यावर नववर्षाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. नाकाबंदी केली आहे. दंगा नियंत्रण, दामिनी पथकही सज्ज झाले आहे. स्ट्रॉयकिंग फोर्स, दंगा नियंत्रण पथक तयार आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार आहे. मुंबईत १३ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

पुणे शहरात बंदोबस्त

पुण्यातील मुख्य चौकात आणि मुख्य रस्त्यांलगत पोलिसांचे पथक तैनात राहणार आहे. रस्त्यावर मध्यरात्री होणारा धुडघुस थांबवण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. बिअर बार, पब आणि हॉटेल्सच्या परिसरात मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्कर आणि त्याचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पुणे शहरात 3500 अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी तैनात असणार आहे. शहरातील विविध भागात आज सायंकाळपासून नाकाबंदी असणार आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते आज सायंकाळनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

कोकणात खाण्याची मेजवाणी

कोकणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता खाण्याची मेजवानी असणार आहे. थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनच्या पार्टीत २५ वेगेगळ्या प्रकरणाचे सीफुड डिशेस असणार आहे. चमचमीत आणि झणझणीत सीफूडवर खवय्यांना ताव मारता येणार आहे. सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय आणि कोकणी फुडची मेजवानीचा मेनू असणार आहे. २५ वेगवेगळ्या सीफुडच्या चवीने पर्यटकांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे.

ठाणे शहरात धडक कारवाई

थर्टी फर्स्ट निमित्त ठाण्यात ठाणे गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई सुरु केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. चरस, गांजा, अल्कोहोल, एमडी अशा विविध नशा करण्यासाठी अमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते. तसेच कासारवडवली लगत रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून 25 मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.