कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 10:21 PM

मुंबई : मान्सूनने भारताच्या वेशी प्रवेश केल्यानंतर आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरु झाली आहे. केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळतायत. या पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (heavy rains in Konkan, Central Maharashtra, Marathwada in next few hours)

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. ठगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचबरोबर वादळी वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. तशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस

सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. मुंबई आणि उपनगराच्या परिसरात बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काल मुंबईत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. आजदेखील सकाळपासून हलकासा पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र, मान्सूनचा पाऊस मुंबईसह राज्यभरात कधी येणार, याची प्रतिक्षा आता सर्वांना लागली आहे.

कराडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

कराड शहर व आसपासच्या परिसरात मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरुन राहिले होते. मलकापुर कराड परिसरात घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. रस्ते व गटारामधुन मोठे पाणी वाहत होते ग्रामीण भागात शेतातील बांध फुटून पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाचा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनाही बसला आहे कराड गोटे येथील निवासस्थानी जोरदार पाऊसाचे पाणी भरल्याने त्यांच्या कार्यालयासह निवासस्थान जलमय झाले होते.

संबंधित बातम्या : 

Weather Alert: मान्सूनचा पाऊस वेशीवर दाखल; कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी

IMD Monsoon prediction: यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 101 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती पाऊस होणार? वाचा सविस्तर

heavy rains in Konkan, Central Maharashtra, Marathwada in next few hours

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.