Pune Metro : मेट्रो प्रवासाचे पुणेकरांचे स्वप्न साकार; जाणून घ्या मेट्रो प्रवासाचे वेळापत्रक, तिकिटाचे दर एका क्लिकवर

दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. पुणे आणि पिंपरीत दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार असून, दार अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी तीननंतर सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. तसेच सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.

Pune Metro : मेट्रो प्रवासाचे पुणेकरांचे स्वप्न साकार; जाणून घ्या मेट्रो प्रवासाचे वेळापत्रक, तिकिटाचे दर एका क्लिकवर
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:30 PM

पुणे – वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या मेट्रोतून प्रवासाचे (Pune Metro ) पुणेकरांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांना त्याच दिवशी मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील (Pune and Pimpri) दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. पुणे आणि पिंपरीत दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार असून, दार अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी तीननंतर सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. तसेच सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.

पुणे मेट्रो तिकिटाचे दर

मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना गरवारे कॉलेज, नळस्टॉप ते आयडीयल कॉलनी पर्यंत 10 रुपये तिकिट असणार आहे. त्यानंतर गरवारे कॉलेज ते आंनद नगरच्या चौथ्या स्टॉपसाठी 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. तर गरवारे कॉलेज ते वनाज स्टॉप पर्यंतच्या प्रवासासाठीही 20  रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. गरवारे कॉलेज ते वनाज पर्यंतच्या मेट्रोचे मार्गवर नळस्टॉप, आयडीयल कॉलनी, आंनद नगर, ही स्थानके असणार आहेत.

पिंपरी चिंचवड मेट्रो तिकीट दर

पिंपरी चिंचवड महानगर पालिका ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो प्रवासासाठीही पहिल्या तीन स्थानकानांसाठी 10 रुपये तिकीट असणार आहे. त्यानंतरच्या तिसरी व चौथ्या स्टेशनासाठी 20  रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यानच्या महामार्गावर संत तुकाराम नगर , भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी ही स्थानके असणार आहेत.

एवढी प्रवासी क्षमता

पुणे व पिंपरी चिंचवड येथील मेट्रोचे तीन डब्बे असणार आहे. यामध्ये एका डब्यात 325 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एका वेळी तब्बल 975  प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामधी एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे.

Modi In Pune: पहले आप… पहले आप… फडणवीस आणि अजित पवारांचा एकमेकांना आग्रह; सर्वाधिक चर्चेतील फोटो काय सांगतो?

PM Modi in Pune : मोबाईलवरुन मेट्रोचं तिकीट काढलं, मोबाईल सुरक्षा रक्षकाला दिला! पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी ठरले नरेंद्र मोदी

Narendra Modi | पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी ठरले नरेंद्र मोदी, दिव्यांगांसोबत मोदींचा पुणे मेट्रो प्रवास

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.