सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापलं, शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा
माण तालुक्यातील पानवण येथील दोन जणांचे अपहरण करुन डांबून ठेवल्या प्रकरणी शेखर गोरे यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Shekhar Gore
सातारा: महाराष्ट्रातील अग्रेसर अशा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. माण तालुक्यातील शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. माण तालुक्यातील पानवण येथील दोन जणांचे अपहरण करुन डांबून ठेवल्या प्रकरणी शेखर गोरे यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटीच्या ठराव प्रकरणात अपहरण झाल्याची चर्चा रंगली आहे. शेखर गोरे यांच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली आहे. (Mhaswad Police register case of kidnapping against Shivsena leader Shekhar Gore)
जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरुन अपहरण नाट्य
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावरुन माण तालुक्यात अपहरण नाट्याचे प्रकार पहायला मिळत आहेत.बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरुन कायदा, सुव्यवस्था कोलमडून गेल्याचे चित्र पाहायला मिळतेय. बँकेच्या निवडणुकीच्या ठरावानंतर डॉ.नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास सुरु असताना आणखी दोन अपहरणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. माण तालुक्यातील पानवन येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला. रविवारी रात्री उशीरा गुन्हयाची नोंद झाली आहे.
डॉ.नानासाहेब शिंदेच्या गाडीची तोडफोड, अपहरण
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून डॉ.नाना शिंदे यांच्या गाडीची तोडफोड करुन अपहरण करण्यात आलं होते. डॉ.नाना शिंदे हे पानवन गावच्या नवनिर्वाचित सरपंचांचे पती असल्याने राजकीय वादातून कृत्य झाले होते. शेखर गोरेंवर गतवर्षीही अपहरणाचा गुन्हा
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कुळकजाई विकास सेवा सोसायटीच्या ठराव प्रक्रियेदरम्यान 3 संचालकांना जबरदस्तीने गाडीत नेल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर गोरेंवर जानेवारी 2020 मध्ये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
शेखर गोरे कोण आहेत?
शिवसेना नेते शेखर गोरे हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. जयकुमार गोरे आणि त्यांच्यामध्ये राजकीय वाद आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंविरोधात निवडणूक लढवली होती. यापूर्वी शेखर गोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सातारा सांगली स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक ते लढले होते. मात्र, दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनी त्यांचा पराभव केला होता. शेखर गोरे यांचा पराभव सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
जयकुमार गोरे, शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे https://t.co/huetUBzQuI
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2020
संबंधित बातम्या:
जयकुमार गोरे-शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे
दोन पक्षांची युती, मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार वि. शेखर गोरे एकमेकांविरोधात उभे!
(Mhaswad Police register case of kidnapping against Shivsena leader Shekhar Gore)