पुणे – कोरोनाच्या महामारीनंतर राज्यभरात होळीचा उत्सव (Holi festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यातही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharne)यांनी आज पुणे शहरातील तळजाई टेकडी येथे धुलीवंदन म्हणजेच धुळवड खेळण्याचा आनंद घेतला आज सकाळी नेहमीप्रमाणे तळजाई टेकडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मॉर्निंग वॉकला गेले असता, त्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या समवेत धुळवड खेळण्याचा आनंद लुटला. तसेच धुळवड खेळत असताना कोरड्या रंगाचा (Dry color) वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या असेही आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे.
याबरोबर शहराच्या विविध भागात तरुणाईबरोबरच विविध सोसायट्यांमध्ये धुलीवंदन म्हणजेच धुळवड खेळण्याचा आनंद लुटला जात आहे.
नांदेड सिटी सोसायटीत महिलांनी एकत्र येत लुटला होळीचा आनंद लुटला. रंगांची उधळण करत होळी साजरी केली. लहान मुलांच्या आनंदालाही उधाण उत्साहाच वातावरण दोन वर्षांनंतर रंगाची उधळण होत आहे. असल्यानं आनंदाला उधाण आले आहे.
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यानंतर आता कॉलेज महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे तरुणाई आनंदाला उधाण आले आहे. अनेक ठिकाणी तरुणाई कोरड्या रंगाची होळी खेळत धुलीवंदनाचा आनंद लुटला आहे.
Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप
चोरीचे Aadhaar Card वापरून बँक खाते ओपन करता येऊ शकते ? याचा तुम्हाला किती फटका बसू शकतो जाणून घ्या