परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्याने कोरोना आला, पूर आला; विश्वजीत कदम यांचं तर्कट
राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी अजब तर्कट मांडलं आहे. परमेश्वराने ठाम भूमिका घेतली. त्यामुळेच कोरोना आला आणि पूर आला. ( Vishwajeet Kadam)
सांगली: राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी अजब तर्कट मांडलं आहे. परमेश्वराने ठाम भूमिका घेतली. त्यामुळेच कोरोना आला आणि पूर आला. त्यामुळे आपल्याला घरात बसावं लागलं, असं तर्कट विश्वजीत कदम यांनी मांडलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (minister of state Vishwajeet Kadam reaction on sangli flood and coronavirus)
सांगलीत शनिवारी पूर परिषद पार पडली. यावेळी विश्वजीत कदम बोलत होते. परमेश्वराने ठाम भूमिका घेत ही शिक्षा आपल्याला दिली आहे. कारण अनेक पिढ्यानपिढ्या आपण शोषण आणि प्रदूषण केले आहे. अनेक खून, चोऱ्या घडत आहेत. त्यामुळे परमेश्वराने ठाम भूमिका घेतली आणि कोरोना आला. आपल्याला घरात बसवलं. त्यानंतर पूर आला. याचा आर्थिक भुर्दंड सर्वाना सोसावा लागला. पण या सर्वाचा सर्वे करून उपाययोजना करण्याची गरज आहे, असं कदम म्हणाले.
उपाय योजना करण्याची गरज
निसर्गाला आपण कारण देतो. पण यामध्ये जे काही बारकावे आहेत. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते, ते शोधले पाहिजेत. सांगली जिल्ह्याला तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे आता उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या दिशेने पाऊले टाकणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितलं.
पूर आणि राजकारणाचा संबंध नाही
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आपली भूमिका व्यक्त केली. पूर येणे हा विषय काही राजकीय नाही. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. मानवाला शक्य होईल तेवढे काम करणे गरजेचे आहे. माणसानेच अतिक्रमण केलं आहे. निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केला आहे. अनेक मशिनरी आल्या. अतिक्रमण केले. तेव्हापासून निसर्ग पुढे गेला आहे. त्यामुळे सांगली शहरात बिबट्या, मगरी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे फार गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मानवाच्या अनेक चुका झाल्या आहेत. याचे दूरगामी परिणाम सोसावे लागणार आहेत, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
तर आपण काहीच करू शकत नाही
एका निश्चित मर्यादेच्या पुढे पाऊस पडला तर आपण काहीच करू शकत नाही. मागच्या धरणाच्या मागे पाऊस पडला तर याचा अनुभव आम्हाला आला. त्यातून पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पडणारा पाऊस आणि धरणात येणार पाऊस याचा ताळमेळ आपण घालू शकतो. पण यावेळी पडणारा पाऊस याचा ताळमेळ घालता आला नाही. त्यामुळे मी अनेकांना गावं सोडायला लावले. त्यामुळे यावेळी जीवितहानी झाली नाही. मागच्या वेळी जिवंत जनावर वाहून गेली. त्यावेळी डोळ्यात पाणी आले होते. मागच्या 2019 ला पाऊस झाला आणि यावेळी साडेसोळा टीएमसी पाऊस 24 तासात पडला. प्रचंड पाऊस पडल्याने पर्याय काहीच नव्हता. जेवढा पाणी खाली जाईल तेवढं चांगले होते. कर्नाटकशी बोलणे झाले त्यांनी सहकार्य केले, असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळेच आपण वाचू शकलो
कोल्हापूरच्या पंचगंगेच पाणी डायव्हर्ट करणे हा एकच पर्याय आहे. तसेच भीमा नदीचं पाणी डाव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाकी सर्व प्रश्न आहेतच. पाण्याचा मोजमाप नाही. उद्या 900 मिलिमीटर पाऊस पडला तर काय करायचं? मानवाची पावसाबरोबरची ही एक शर्यत आहे, असं ते म्हणाले. ज्या ठिकाणाहून सांगली शहरात पाणी शिरते, त्या ठिकाणी भिंत बांधणे शक्य आहे का? याचा विचार सुरू आहे. तसेच किती ही पाऊस आला तरी आपल्या कृष्णा नदीनं दिशा बदलली नाही. त्यामुळेच आपण वाचू शकलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (minister of state Vishwajeet Kadam reaction on sangli flood and coronavirus)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 August 2021 https://t.co/RBeYyMZHSb #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021
संबंधित बातम्या:
आपण निसर्गाशी खेळ केला म्हणूनच बिबट्या, मगरींचा शहरात संचार; जयंत पाटलांनी दिला सावधानतेचा इशारा
‘नारायण राणेंना पब्लिसिटी स्टंटचा मोह आवरला नाही, लोकांचं आरोग्य वेठीस धरलं’
बैलगाडी शर्यत होणार की नाही?, मंगळवारी विशेष बैठक; जयंत पाटलांची माहिती
(minister of state Vishwajeet Kadam reaction on sangli flood and coronavirus)