पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी 6695 कोटींचा प्रकल्प, राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरु

पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्यास लागणारा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी 6695 कोटींचा प्रकल्प, राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरु
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 6:49 PM

पुणे : पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्यास लागणारा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याठिकाणी असणाऱ्या बोगद्याचे काम 2 किलोमीटरपर्यंत झाले आहे. द्रुतगती महामार्गावरील खंडाळा (बोर) घाटमाथा परिसरात अनेक नागमोडी वळणे तीव्र चढ उताराची आहेत. या क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या परिसरात शेकडो अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जण जायबंदी झाले आहेत. घाटमाथा परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर उपाय म्हणूनच हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवला जात आहे (Missing link project to save travel time of Mumbai Pune in Khandala).

‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होणार आहे. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रकल्पाला भेट दिली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांचं काम सुरु आहे. त्या अंतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळापर्यंत (सिंहगड संस्था) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी 19.80 किलोमीटर असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील 5.86 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण करण्याचं काम सुरु आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या भागातील 13.3 किलोमीटर राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट बांधण्यात येणार आहेत.

प्रकल्पाची गरज

आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (6 लेन) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (4 लेन) एकत्र येतात आणि खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट आणि चढ उताराचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागते. त्यातून वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून हा प्रकल्प राबवला जात आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यान 8 पदरी 2 बोगद्यांसह नवीन रस्ता करणे
  • बोगदा क्र. 1 : 1.75 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
  • बोगदा क्र. 2 : 8.92 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
  • बोगद्यांची रुंदी 21.45 मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार
  • मुंबई आणि पुण्याकडे जाणारे दोन्ही बोगदे दर 300 मीटर अंतरावर एकमेकांना क्रॉस पॅसेजव्दारे जोडण्यात येणार
  • खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यान 8 पदरी 2 व्हाया डक्टसह नवीन रस्ता आणि खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे
  • व्हायाडक्ट क्र. 1 : 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूल
  • व्हायाडक्ट क्र. 2 : 650 मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल
  • 8 पदरीकरण : 5.86 किलोमीटर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट

हेही वाचा :

साताऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

Tanay Manjrekar | पुण्याचा तनय मांजरेकर ‘हायपरलूप’मध्ये बसणारा पहिला भारतीय

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

Missing link project to save travel time of Mumbai Pune in Khandala

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.