Pune Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल, सभेचा आढावा अन् जोरबैठका; टीझरही आला
राज ठाकरे पुण्यात आज दाखल झाले. यावेळी किशोर शिंदे, अजय शिंदे अविनाश अभ्यंकर राज ठाकरेंना भेटण्यासाठी निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा जंगी होणार असल्याची चर्चा आहे.
पुणे : अयोध्या (Ayodhya) तर नाही पण पुण्यात मात्र राज ठाकरे दाखल झाले आहेत. परवा म्हणजेच 22 मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा जंगी घेण्याच्या सूचना आधीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आता मध्ये दोन दिवस आहेत. या दोन दिवसांत पुण्यातील पक्षाच्या स्थितीचा आढावा तसेच 22 तारखेच्या सभेच्या तयारीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले होते. प्रकृतीच्या कारणास्तव पुणे दौरा अर्धवट सोडून ते मुंबईला गेले होते. अयोध्या दौरा करणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनीही त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. शेवटी त्यांनी आपला आगामी अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केला आहे. या सर्वांची उत्तरे राज ठाकरे आपल्या पुण्यातील (Pune) सभेत देणार आहेत.
‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक टिझर ट्विट करून अयोध्या दौरा रद्द केल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तर ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या गणेश कला क्रीड मंच या ठिकाणाचा उल्लेख करून सर्वांना येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आधी त्यांची सभा डेक्कनजवळ नदीपात्रात होणार होती, मात्र नंतर हे ठिकाण बदलून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी आयोजित केली आहे. सकाळी दहावाजता ही सभा होणार आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
सभा जंगी होणार?
राज ठाकरे पुण्यात आज दाखल झाले. यावेळी किशोर शिंदे, अजय शिंदे अविनाश अभ्यंकर राज ठाकरेंना भेटण्यासाठी निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा जंगी होणार असल्याची चर्चा आहे. पुणे दौऱ्यावर असताना दोन दिवसांपूर्वी मनसेची बैठक झाली होती. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. मनसेच्या शहर कार्यकारीणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या होत्या. सभेला जास्तीत नागरिकांना येण्याचे आवाहन करा, सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करा, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. औरंगाबाद मनसेने सभेची जशी तयारी केली होती, तशी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.