MNS : मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदा मुंबईबाहेर, ठिकाणही ठरलं, राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय.

MNS : मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदा मुंबईबाहेर, ठिकाणही ठरलं, राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 2:27 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या आहेत. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पुणे दौऱ्यात (Pune) विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. तर, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.

मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरे उद्या सकाळी मनसे पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. तर, संध्याकाळी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदा मुंबईबाहेर

मनसेचा वर्धापनदिन यावेळी पुण्यात होणार असल्याची माहिती आहे. 9 मार्चला मनसेचा वर्धापनदिन सोहळा असतो. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंचं लक्ष महापालिका निवडणूक

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती. आता मनसेनं राज्यातील महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईसह मनसेनं यावेळी ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलंय.

इतर बातम्या:

भोरमधील वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक ; धरणे आंदोलन करत महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

विद्यार्थ्यांना दिलासा ! सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठातील शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जात मुदत वाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.