राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर, शाखाध्यक्ष निवडीच्या घोषणेसोबतच पदाधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात जाऊन राज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या राजकीय विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील शाखाध्यक्षांच्या निवडीची करणार घोषणा करतील.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शुक्रवारी पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात जाऊन राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या राजकीय विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील शाखाध्यक्षांच्या निवडीची घोषणा करणार आहेत. मागील महिनाभरातील राज यांचा हा पाचवा पुणे दौर असणार आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी 13 ऑगस्ट रोजी पुण्याचा दौरा केला होता. (MNS chief Raj Thackeray will visit Pune again will announce name of MNS Shakha Chief)
आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुण्याच्या मनपा निवडणुकीसाठी मनसैनिकांमध्ये उस्ताह भरण्यासाठी राज मागील काही दिवसांपासून पुण्याचा सातत्याने दौरा करत आहेत. यापूर्वी 13 ऑगस्ट तसेच त्याआधी 27 जुलै रोजी राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्याला जाणार आहेत. येथे ते पुण्यातील शाखाध्यक्षांच्या निवडीची घोषणा करतील.
राज ठाकरेंचा पुणे दौरा
ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune) हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता.
45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा
दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164
इतर बातम्या :
अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला
(MNS chief RTaj Thackeray will visit Pune again will announce name of MNS Shakha Chief)