अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी?, मोठा निर्णय काय?; पुण्यातील राजकारण बदलणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर येण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी?, मोठा निर्णय काय?; पुण्यातील राजकारण बदलणार?
amit thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 12:16 PM

पुणे | 26 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणुकीला अवघे आठ नऊ महिने बाकी आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढच्या आठवड्यात मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, दुसरीकडे एनडीएमध्ये जोरबैठका सुरू आहेत. छोट्या पण राजकीय उपद्रव्य मूल्य अधिक असलेल्या राजकीय पक्षांनीही आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मनसेनेही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पुणे हा त्यापैकी एक मतदारसंघ आहे. पुण्यातून मनसेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे मनसेच्या उमेदवारासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यास पुण्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

वसंत मोरेंकडून जबाबदारी काढली

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरेंवर पुण्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी पुण्यावर अधिक लक्ष दिलं आहे. यापूर्वी बारामती लोकसभा निवडणुकिसाठी वसंत मोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र पुणे काबीज करण्यासाठी राज ठाकरेंनी युवा नेते अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. पक्ष बांधणी, उमेदवार निवड, प्रचार अशा विविध जबाबदाऱ्या अमित ठाकरे पार पाडणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. उमेदवारांची चाचपणी, मुलाखती याचा आढावा स्वतः अमित ठाकरे घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

वसंत मोरे यांना हटवण्याचे कारण काय?

पुण्यात मनसेत सर्व काही अलबेल नाही. पुण्यातील मनसेचा एक मोठा गट वसंत मोरे यांच्या विरोधात आहे. या गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने कार्यक्रमातून डावललं जात आहे. पक्षातील निर्णय प्रक्रियेतही मोरे यांना सहभागी करून घेतलं जात नसल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत वसंत मोरे यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली आहे. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. पक्षातील या अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते वसंत मोरे यांच्या हाताखाली काम करण्याची शक्यता कमी असल्यामुळेच अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मोरे काय करणार?

दरम्यान, वसंत मोरे यांनी अनेकदा पुणे लोकसभेतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत आपण राज ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, पुणे लोकसभेची जबाबदारी त्यांच्याकडून काढून अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचं वृत्त धडकलं आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.