MNS Vasant More : राज ठाकरेंसोबत काल कुठेही न दिसलेले वसंत मोरे अखेर औरंगाबादकडे रवाना, सभेला राहणार उपस्थित

मी राज ठाकरेंच्या राजमार्गावरचा माणूस आहे. मी राजमार्गावरच आहे. उशिरा का होईना पोहोचलो, असे म्हणत उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेलाही उपस्थित राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी काल सांगितले होते.

MNS Vasant More : राज ठाकरेंसोबत काल कुठेही न दिसलेले वसंत मोरे अखेर औरंगाबादकडे रवाना, सभेला राहणार उपस्थित
कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना झाले वसंत मोरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 2:40 PM

पुणे/औरंगाबाद : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. कार्यकर्ते घेऊन वसंत मोरे औरंगाबादेत पोहोचणार आहेत. काल सकाळी वसंत मोरे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) बाजूला नसल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना पूर्णविराम लागला असून कार्यकर्त्यांसह वसंत मोरे औरंगाबादेत 5 वाजता दाखल होतील, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा होणार आहे, ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये गर्दी केली आहे. विविध शहरातून, जिल्ह्यातून मनसे सैनिक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. कार्यकर्ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले असून, राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत आहे. नाशिकमधील एका कार्यकर्त्याने तर हनुमानाचा वेष परिधान केलेला पाहायला मिळाला आहे.

‘महत्त्वाचे काम असल्याने गैरहजर’

काल राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादकडे रवाना झाले. त्यांनी वढूला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळीही भेट दिली. या गर्दीत नगरसेवक वसंत मोरे कुठेच पाहायला मिळाले नाहीत. परंतु राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाल्यानंतर मोरे वढू येथे पोहोचून त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. सकाळपासून गाड्यांची मिसमॅच होत आहे. औरंगाबादला माझे नियोजन उद्या सकाळचे आहे. पण अचानक मला मेसेज आला, की आजच जायचे आहे. मात्र माझे दुसरे महत्त्वाचे काम आज आले. यात गैरसमज नकोत म्हणून याठिकाणी आल्याचे काल मोरे म्हणाले होते. तर मी राज ठाकरेंच्या राजमार्गावरचा माणूस आहे. मी राजमार्गावरच आहे. उशिरा का होईना पोहोचलो, असे म्हणत उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेलाही उपस्थित राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी काल सांगितले होते.

पोलीस बंदोबस्तात वाढ

औरंगाबादमध्ये आज राज ठाकरे यांची सभा होत आहे. सभास्थळी आणि शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सभा स्थळावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी एका वाक्यात उत्तर देऊन प्रश्न निकाली काढला. महाराष्ट्र दिनी राजकीय सभांचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे मनसेची तर दुसरीकडे भाजपचीही सभा पार पडणार आहे, असे ते म्हणाले होते.

कार्यकर्त्यांसह वसंत मोरे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.