पुण्यात होणार 6 हजार झाडांची कत्तल ; मनसेच्या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिले पत्र…
याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी वसंत मोरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे. त्याबरोबरच पर्यायी उपाय शोधण्याची वसंत मोरे यांनी मागणीही केली आहे.
पुणे : पर्यावरणाविषयी सगळी जनजागृती चालू असतानाच आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. मनसे नेते वसंत मोरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आजही ते चर्चेत आले ते ही वेगळ्याच कारणासाठी कारण सध्या पर्यावरण, वृक्ष लागवड, वृक्षतोड याविषयी समाजात जागृती चालू असतानाच पुण्यात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीबद्दल वसंत मोरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आहे. त्यामुळे पुण्यातील वृक्षतोडीचा मुद्दा आता गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
वसंत मोरे यांनी याविषयी ठाम भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता पुण्यात होणाऱ्या वृक्षतोडीवर शासन आणि महानगरपालिका काय निर्णय घेणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत मुळा मुठा नदीच्या पात्रातील होत असलेली वृक्षतोडी यासंदर्भात वसंत मोरे यांनी पत्र लिहिले आहे.
नदीपात्रातील होणाऱ्या वृक्षतोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला असून आगामी काळात यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसंत मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकल्पांतर्गत एकूण 6 हजार वृक्ष तोडले जाणार असून मनसेने या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी वसंत मोरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे. त्याबरोबरच पर्यायी उपाय शोधण्याची वसंत मोरे यांनी मागणीही केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन या प्रकरणात उडी घेतल्याने पुण्यातील वृक्षतोडीप्रकरणी राजकारण तापणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने मनसेचा कायम विरोध असणार असल्याचेही त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.