Video | पुण्यात मनसेचा राडा, कामगारांना कमी केल्यामुळे कार्यालयाची तोडफोड, व्हिडीओ व्हायरल
बेकायदेशीररित्या कामगारांना कमी केल्यामुळे मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. (MNS protesters vandalised Fresenius Company pune)
पुणे : बेकायदेशीररित्या कामगारांना कमी केल्यामुळे मनसेने (MNS) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मनसेने फ्रेसेनियस काबी कंपनीच्या (Fresenius Company) पुणे येथील कार्यालयाची तोडफोड केली आहे. या तोड़फोडीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (MNS protesters vandalised the office of Fresenius Company of pune)
कामगारांचे प्रश्न, स्थानिकांना रोजगार या मुद्द्यांवरुन मनसेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. पुण्याच्या फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामागारविषयक धोरणावर संतापून या कार्यालयाची थेट तोडफोड केली आहे. फ्रेसेनियस कंपनीत कामगारांना बेकायदेशिरित्या कामावरुन कमी केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच, या कंपनीकडून कामगारांचा पगारही वाढवला जात नसल्याचं मनसेने म्हटलं आहे. याच कारणांमुळे मनसेने पुणे येथील या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
मनसेने केलेल्या तोडफोडीचा व्हिडीओ :
मनसेचे कंपनीवरील आरोप काय?
>>> बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून कमी करणे.
>>> कामगारांना पगार वाढणार न करणे.
>>> कामगारांवर अन्याय करणे.
>>> संघटनेला चर्चेला वेळ न देणे.
>>> संघटनेचा नाम फलक लावण्यास विरोध करणे.
इतर बातम्या :