Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune By-Election : पुण्यात अखेर तेच झालं जे लोकांना वाटलं, मनसेचं इंजीन त्याच ट्रॅकवर धावलं

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोरव आलीय.

Pune By-Election : पुण्यात अखेर तेच झालं जे लोकांना वाटलं, मनसेचं इंजीन त्याच ट्रॅकवर धावलं
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:12 PM

पुणे : पुण्यातून (Pune) एक खूप मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pune By-Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे मनसेच्या (MNS) गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. मनसे कसबा आचि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) मदत करणार असल्याचं स्पष्ट झालंय. मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा झालीय. मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिलीय.

भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आहे. वरिष्ठ स्तरावर बोलणं झालंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भाजप नेते आज मनसेच्या नेत्यांच्या भेटीला गेले.

पुण्यातील भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि माधूरीताई मिसाळ यांनी मनसे नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पाठिंबा मागितल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या भेटीनंतरच पुण्यात पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आलीय.

भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील गेल्या काही दिवसांमधील जवळीक वाढली आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतल्याच्या बातम्या याआधीच समोर आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आल्याचे बघायला मिळाले होते.

दुसरीकडे गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांना युतीसाठी खुली ऑफरही दिलीय. त्यामुळे पुण्यात भाजप आणि मनसे एकत्र येईल, असं अनेकांना वाटत होतं. अखेर पुण्यात तसाच निर्णय झाल्याची माहिती समोर येतेय.

चिंचवडमध्ये ‘वंचित’च्या पाठिंब्यासाठी रस्सीखेच

दुसरीकडे चिंचवड विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झालीय. महाविकास आघाडीचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनीही वंचितला तसा प्रस्ताव पाठवला आहे.

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे या दोघांनीही तशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणाला पाठिंबा देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.