Hanuman Chalisa : वाद टळला… पुण्यातला मनसेचा हनुमान चालिसा कार्यक्रम रद्द
पोलिसांनी (Police) समज दिल्यानंतर पुण्यात मनसैनिकांनी (MNS activist) स्पीकरवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार होता.
पुणे : पोलिसांनी (Police) समज दिल्यानंतर पुण्यात मनसैनिकांनी (MNS activist) स्पीकरवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार होता. मनसेच्या कसबा पेठ शाखेचे सूरज पंडित यांनी या कार्यक्रमाविषयी सांगितले होते. मात्र, मनसेचे स्पीकर मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर लावण्यापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांना समज दिली. त्यामुळे पहाटे चौकीच्या बाहेर ना मनसैनिक आले ना स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली गेली. पोलिसांनी समज दिल्यानंतर हा प्रकार टाळल्याने होणारा वादंगही टळला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी हा वादग्रस्त कार्यक्रम आयोजित केला होता.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बदलली भूमिका
मनसेच्या कार्यकर्त्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मनसेने ही भूमिका घेतली आहे. दरम्यान, या भूमिकेमुळे होणारा संभाव्य वाद टळला आहे.
काय आहे वाद?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (masjid loudspeaker) हटवण्यासाठी दंड थोपटले. राज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिले. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असे युरोपातील शासन आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.
पाहा व्हिडिओ
आणखी वाचा :