Pune crime : राजगुरूनगरात रात्रीच्या वेळी कारमधून मोबाइल चोरणारा अन् विकत घेणारा अडकला पोलिसांच्या सापळ्यात
पुण्याच्या राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात रात्रीच्या वेळेस कारमधील मोबाइल चोरणाऱ्या एका चोरट्यासह मोबाइल विकत घेणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. राजगुरूनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून ही अटकेची (Arrest) कारवाई करण्यात आली आहे.
राजगुरुनगर/पुणे : पुण्याच्या राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात रात्रीच्या वेळेस कारमधील मोबाइल चोरी करणाऱ्या एका चोरट्यासह मोबाइल विकत घेणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. राजगुरूनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून ही अटकेची (Arrest) कारवाई करण्यात आली आहे. चोरट्याने राजगुरुनगर येथील सद्गुरू हॉटेल खेड येथे वॅगनार गाडीमधून मोबाइल चोरून (Mobile stole) नेला होता. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली. त्या माहितीनुसार दीपक गोरोबा नाईकनवरे हा चोरीचा मोबाइल वापरत असून तो त्याच्या एका मित्रासोबत चांडोली फाटा येथे येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी जाऊन सापळा लावून दीपक गोरोबा नाईकनवरे यास ताब्यात घेतले.
चोरीस गेलेला मोबाइल जप्त
दीपक गोरोबा नाईकनवरे याच्याकडून चोरीस गेलेला मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे विचारपूस करून त्याने वापरत असलेला मोबाइल हा अनिकेत प्रदीप बगाटे (वय 26, रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे) याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार अनिकेत प्रदीप बगाटे यासही ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात
या प्रकरणी दीपक गोरोबा नाईकनवरे (वय 30, रा. चांडोली फाटा, ता. खेड, जि. पुणे) आणि अनिकेत प्रदीप बगाटे (वय 26, रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे) यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाईसाठी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.