नया मुल्ला नमाज ज्यादा पढता है”; संजय राऊत यांच्यावर भाजपच्या खासदाराची सडकून टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार चांगलं काम करत असून वातावरण खराब करून बदनामी।केली जात आहे असा आरोपही संजय राऊत यांच्यावर केला आहे.
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांना मुंबई महानगरपालिका, हिंदुत्ववाद आणि दंगली, त्र्यंबकेश्वर मंदिरावरून खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करताना दंगली प्रकरणात या लोकांच्या आधी चौकशी व्हायला हवी असा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला होता. त्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जे.पी. नड्डा यांच्यावर टीका केली गेल्यामुळे आता भाजपचे खासदार अनिले बोंडे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘नया मुल्ला, नमाज ज्यादा पढता है’, अशा स्वरुपाची टीका त्यांनी खासदार राऊत यांच्यावर केली आहे.
संजय राऊत मुस्लिमांची तळी उचलून धरत आहे असा टोलाही अनिल बोंडे यांनी त्यांना लगावला आहे. दंगली वरून फक्त मुस्लिम समाजाला जबाबदार न धरता.
दंगली नंतर भडकावू भाषण करणाऱ्यांचीही चौकशी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यावरूनच भाजप नेत्यांनी त्यांना धारेवर धरले आहे.
राज्यात वेगवेगळ्या ठिकठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्यावरून राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. त्यामुळे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.
त्यावरुनच खासदार अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या दंगली प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, दंगली घडवण्याच्या कट कारकास्थानात संजय राऊत एक माध्यम आहेत अशी गंभीर टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात दंगली घडल्या आहेत.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर स्वरुपाच्या आरोप केले आहेत. राज्यातील वातावरण बिघडवण्याचं काम विरोधी पक्षाकडून केलं जातं असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार चांगलं काम करत असून वातावरण खराब करून बदनामी।केली जात आहे असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
-तर अनिल बोंडे यांनी सांगितले की, जे. पी. नड्डा यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.