मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक

मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना निवडावा लागणार ईडब्लूएस पर्याय निवडण्या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. MPSC Maratha Reservation

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 10:47 PM

पुणे: मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना निवडावा लागणार ईडब्लूएस पर्याय निवडण्या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गाऐवजी आता ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. उमेदवारांकडे खुल्या प्रवर्गाची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रवर्ग निवडीबाबतचं परिपत्रक काढलं असून 23 जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. (MPSC issue circular for Maratha students who choose SEBC reservation now gave chance to choose EWS or Open Category till 23 June)

12 परीक्षांसाठी प्रवर्ग बदलावा लागणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर, २०१८ नंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित पदांच्या आधारे भरतीप्रक्रिया राबवली होती. त्या भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या व शिफारशी करण्यात न आलेल्या केवळ एकूण 12 संवर्ग/परीक्षांच्या बाबतीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्यासंबंधित उमेदवारांना अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे याची निवड करायची आहे.

परीक्षेचे नाव

  1. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019
  2. पशुधन विकास अधिकारी, गट-अ
  3. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019
  4. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019
  5. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020
  6. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020
  7. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, गट-अ
  8. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट ब
  9. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020
  10. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020
  11. वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ आदिवासी विकास विभाग
  12. अनुवादक (मराठी), गट-क

प्रवर्ग निवडणार नाही त्यांना खुला प्रवर्गात ग्राह्य धरणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या दिनांक ४ जानेवारी, २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकास अनुसरुन कोणत्याही पदभरती/परीक्षांकरीता यापूर्वी प्रवर्ग निवडला असला तरी मराठा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने प्रवर्ग निवडावा लागेल.

EWS प्रमाणपत्र सादर कागदपत्र पडताळणीवेळी सादर करावे लागणार

अराखीव (खुला) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या लाभाकरीता विकल्प सादर करणा-या उमेदवारांनी संबंधित जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी 31 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिका-याकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे व प्रमाणपत्र पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील.

प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्रपणे प्रवर्ग निवडावा लागणार

एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षा/संवर्गाकरीता खुला किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडावा लागेल.

प्रवर्ग कसा निवडायचा?

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी pd/e परीक्षांकरीता अर्ज केला आहे. त्या प्रत्येक पदभरती/परीक्षांकरीता अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांपैकी प्रवर्ग निवडावयाचा आहे. त्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘Online Facilities’ या सदराखालील SEBC Option Change लिंक वर क्लिक करावं.

(1) पदभरती / परीक्षांपैकी अर्ज केलेल्या पदभरती / परीक्षेची जाहिरात निवडा.

(2) अर्जामध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक दाखल करुन मिळणारा OTP सादर करुन लॉगीन करावे.

(3) अराखीव (खुला) / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी योग्य प्रवर्ग निवडा.

(4) ‘Submit’ बटणावर क्लिक करुन निवडलेला तपशील सादर करावा.

(5) प्रवर्ग निवडल्याबाबतच्या नोंदीची प्रिंट आऊट काढून ठेवा

23 जून पर्यंत प्रवर्ग निवडता येणार

लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या पदभरती प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना दोन पर्याय निवडावे लागणार आहेतय खूला ( ओपन प्रवर्ग ) आणि दोन ईडब्लूएस या पैकी योग्य पर्यायची निवड करण्याची अंतिम मुदत 23 जून पर्यंत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या:

राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार, सारथी संदर्भात शनिवारी बैठक होणार

राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम?; वाचा सविस्तर

(MPSC issue circular for Maratha students who choose SEBC reservation now gave chance to choose EWS or Open Category till 23 June)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.