एसटीची खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्याची जोरदार तयारी, लांब पल्ल्यासाठी प्रथमच अशी बस

| Updated on: Aug 19, 2023 | 12:27 PM

Pune News : राज्याची ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लाल परी काळानुसार बदल करत आहे. एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरे सर्वत्र एसटीच दिसणार आहे.

एसटीची खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्याची जोरदार तयारी, लांब पल्ल्यासाठी प्रथमच अशी बस
st sleeper bus
Follow us on

पुणे | 19 ऑगस्ट 2023 : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु खासगी ट्रॅव्हल्सकडून मिळणाऱ्या सुविधी एसटी प्रवास नसल्यामुळे काही जण खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करत होते. विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास केला जात होता. परंतु आता एसटीने बदल केले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी गाड्या सुरु केल्या आहेत. त्यासाठी पुणे येथील दापोली डेपोत नवीन बस तयार झाली आहे. ही बस लवकरच रस्त्यावर धावणार आहे.

कोणत्या बसेस येणार

राज्यात प्रवाशांकडून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वाधिक पसंती ‘शयनयान’ म्हणजेच स्लीपर बस गाड्यांना दिली जाते. परंतु एसटीच्या ताफ्यात शयनयान बसेस नव्हत्या. यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्लिपर कोच गाड्या तयार केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील कार्यशाळेत या गाड्यांची बांधणी जवळपास पूर्ण होत आली आहे. यामुळे लवकरच या बसेस रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. एसटी महामंडळाकडून एकूण दहा बसची बांधणी केली जात आहे. बांधणीनंतर त्या विविध विभागांना वितरीत केल्या जातील.

हे सुद्धा वाचा

काय आहेत सुविधा

  • प्रवाशांना आरामदायी सुविधा
  • बाहेरील प्रकाशाचा त्रास टाळण्यासाठी खिडक्यांना आकर्षक रंगाचे पडदे
  • प्रवाशांना झोपण्यासाठी गादी आणि उशी एकत्र
  • प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा
  • पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी सुविधा, पर्स अडकवण्यासाठी हूक.
  • प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडिंग लॅम्प
  • चालकाच्या केबिनमध्ये उद्घोषणा करण्यासाठी प्रणाली.
  • दिव्यांग व्यक्तींसाठी एक आरक्षण आरक्षितस त्यामध्ये दिव्यांग प्रवाशाच्या सुविधेसाठी बेल
  • सामान ठेवण्यासाठी डाव्या बाजूला सामानकक्ष

सुरक्षेची अशी केली गेली तयारी

एसटीच्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा कार्यन्वीत केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी बल्कहेड पार्टीशनवर इंटरकॉम बसवला आहे. त्याचे बटण बसच्या चालकाकडे ठेवले गेले आहे. चालकाच्या डोळ्यावर सरळ ऊन येऊ नये, यासाठी पडदा बसवला आहे. गाडीत शेवटी आपत्कालीन दरवाजा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत गाडीच्या एसटीचे काच फोडण्यासाठी अनेक ठिकाणी हातोडे दिले आहेत. आग विझविण्यासाठी दोन अग्निशामक उपकरणे असतील. तसेच इंजिनसाठी एफडीएसएस अग्निशामक यंत्रणा बसवली गेली आहे.