अभिजित पोते, पुणे : संरक्षण संशोधन संस्थेत (डीआरडीओ) मध्ये उच्च पदावर कार्यरत, निवृत्तीस केवळ सहा महिने, डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वासोबत काम करणारा अधिकारी पाकिस्तानच्या जाळ्यात अडकला. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील DRDO या संस्थेत संचालक असलेले प्रदीप कुरुलकर याला या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तपासात अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. व्हॉट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे पाकिस्तानशी संपर्क त्याने ठेवला होता.
चौकशीत काय मिळाले
अटक केल्यानंतर ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याची एटीएस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत त्याने पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचे उघड झाले आहे. प्रदीप कुरुलकर याच्याकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे उघड झाले आहे. शासकीय गुपिते आणि संवेदनशील माहिती व्हॉटसॲप मेसेज, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलद्वारे पाकिस्तानच्या हस्तकाला दिल्याचे समोर आले.
मुंबई एटीएसकडून चौकशी
‘डीआरडीओ’ने हे प्रकरण मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्याकडे सोपविले. या प्रकरणी मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच, न्यायालयाने आरोपी कुरुलकर याला ९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या या शास्त्रज्ञाकडून तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लॅपटॉप मोबाइल जप्त
कुरुलकर हा वापरत असलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलची ‘डीआरडीओ’ अंतर्गत न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. या संदर्भात प्राप्त अहवालानुसार आरोपी कुरूलकर हा ‘डीआरडीओ’च्या संचालकपदी असताना पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या सतत संपर्कात होते. कुरुलकर यांनी पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित केल्याची माहिती डीआरडीओला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्यांवर गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष ठेवले जात होते.
निवृत्त होण्यास फक्त सहा महिने
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले. त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांना निवृत्त होण्यासाठी फक्त 6 महिने बाकी आहेत. परंतु ते पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील एका महिलेच्या संपर्कातही होते. DRDO ची व्हिजिलेंस व इंटीलिजेंस टीम अनेक महिन्यांपासून त्यांच्यांवर नजर ठेवून होती. डीआरडीओ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एटीएसने गुरुवारी त्यांना अटक केली.
हे ही वाचा
कराचीमधील हसीना, पुणे शहरातील दिवाना…सुरु झाली प्रेमकथा अन् घडली अद्दल