Mumbai Pune Expressway : अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर स्पीड ब्रेकर, सात ठिकाणी हॉट स्पॉटवर रंबळ स्ट्रीप
मुंबई-पुणे जुना महामार्ग अरुंद व नागमोडी वळणांचा असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी अधिक वेळ लागत होता. तसेच वाहतुकीची अधिक कोंडी होत असे. त्यामुळे जलद गतीने प्रवास होण्यासाठी द्रुतगती महामार्ग उभारण्यात आला.
मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) ताशी 80 किलोमीटरची वेगमर्यादा आहे. मात्र वाहन चालक सरकारकडून जाहीर केलेली नियमावली पायदळी तुडवत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी पळवणाऱ्या चालकांना पोलिसांनी (Police) अनेकदा दंडही केले आहेत. तसेच अति स्पीडमुळे अपघाताचे प्रमाण देखील अधिक झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे हॉट स्पॉट असलेल्या सात ठिकाणी रंबळ स्ट्रीप टाकण्यास सुरुवात केली आहे. हे केल्याने वाहनाने वेगाने चालवणाऱ्या अनेकांना गाडी स्लो करावी लागणार आहे. अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून, अफकॉन कंपनीसमोर उतारावरही रंबळ स्ट्रीप (Rubber Strip) बसविण्यात येणार आहेत.
गाडी स्पीडने दामटवत असल्याने अपघातामध्ये वाढ झाली
मुंबई-पुणे जुना महामार्ग अरुंद व नागमोडी वळणांचा असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी अधिक वेळ लागत होता. तसेच वाहतुकीची अधिक कोंडी होत असे. त्यामुळे जलद गतीने प्रवास होण्यासाठी द्रुतगती महामार्ग उभारण्यात आला. यामुळे पनवेलहून निघालेले वाहन तास दीड तासातच पुण्याला पोहोचते. विशेष म्हणजे पूर्वी बोर घाटात वाहतुकीचा विचका पाहायला मिळत होता. मात्र वाढलेली वाहनांची संख्या त्यातच गुळगुळीत व सहा पदरी रस्त्यांमुळे चालक आपल्या गाड्या ताशी 120 ते 130 पर्यंत दामटवत असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येचा आलेख चढता आहे.
या सात हॉट स्पॉटवर रंबळ स्ट्रीप
कॅमेरे बसवतानाच स्पीडगन वाहने तैनात करण्यात आली आहेत. परंतु, त्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही.सतत अपघाताच्या घटना घडत असल्याने अफकॉन कंपनीने सात ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यास सुरुवात केली आहे. अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास व अंडा पॉइंट अशा चार ठिकाणी यापूर्वीच रंबळ स्ट्रीप बसवण्यात आले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सध्या दोन ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे रोज तीनवेळा पंधरा मिनिटांचा ब्लॉक घ्यावा लागते. ज्यावेळी कामासाठी ब्लॉक घेतला जातो.
त्यावेळी अधिक ट्रॅफिक होत असल्याचे पाहायला मिळते.