Pune : पुण्यात तीन महिन्यांपासून वेतन न दिल्याने महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; ससून रुग्णालयात उपचार सुरू
या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विविध रुग्णालयात उद्यानात , कार्यालयात, इमारतींमध्ये हे काम देण्यात आले आली आहेत. कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या या सुरक्षा रक्षकांना कायद्याअंतर्गत कोणतेही सुविधा दिल्या जात नाहीत.
पुणे – मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने (Pune Municipal Corporation)सुरक्षा रक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विन वसंत पवार (Ashwin Pawar) असं या सुरक्षा रक्षकाचे नाव असून महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं त्याची नियुक्ती करण्यात आली होती. अश्विन पवार हे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. वेतनाबाबत पीडित कर्मचारी सातत्याने महापालिका अधिकाऱ्यांकडे विनवणी करत होते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिका अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत असा आरोप राष्ट्रीय मजदूर संघटनेने (National Labor Organization)केला आहे. महापालिकेच्या विविध भागात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम क्रिस्टल या कंपनी देण्यात आले आहे.
काय आहे काम
महानगरपालिकेकडून विविध विभागांसाठी कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती केली जाते. महापालिकेनं हे कंत्राट क्रिस्टल या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून महापालिकेत जवळपास पंधराशेहून अधिक कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विविध रुग्णालयात उद्यानात , कार्यालयात, इमारतींमध्ये हे काम देण्यात आले आली आहेत. कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या या सुरक्षा रक्षकांना कायद्याअंतर्गत कोणतेही सुविधा दिल्या जात नाहीत.
मजूर संघटनेकडून निषेध
या घटनेचा राष्ट्रीय मजदूर संघाने तीव्र निषेध केला आहे. आज महानगरपालिकेच्या समोर कंत्राटदार व पालिका अधिकाऱ्यांचा निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंत्राटदार व अधिकारी यांच्यात हात मिळवणी असल्याने कंत्राटी सुरक्षा रक्षकांना नाहकत्रासाला समोर जावे अलगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील पीडित अश्विन यांच्यावर उपचार सुरु असून , त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही अद्यायावत माहिती समोर आलेली नाही.