सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत राहणार; नाना पटोले यांची ग्वाही
स्वबळाचा नारा लावणं चुकीचं नाही. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. असा नारा दिल्याने महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शब्द दिला आहे. (nana patole)
पुणे: स्वबळाचा नारा लावणं चुकीचं नाही. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. असा नारा दिल्याने महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहणार आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे दिली. (MVA alliance for 5 years, we are with shiv sena: nana patole)
नाना पटोले आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही ग्वाही दिली. भाजप आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. स्वबळावर लढूनच पाच वर्षे सरकार चाललंय. स्वबळाचा नारा देणं चुकीचं नाही. काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्ष राहणार आहे. सोनिया गांधी यांनी त्यांना तसा शब्द दिला आहे, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पक्षप्रमुख म्हणून बोलले, असंही पटोले यांनी सांगितलं.
राऊतांना टोला
काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याबाबतचं एकमत आहे. आम्ही स्वबळावर लढणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणारच. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत आहे. त्यात आम्ही स्वबळावर लढू, असं सांगतानाच ते कदाचित आमची भाषणं ऐकत नसतील, असा चिमटा पटोले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना काढला.
तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहून भाजपशी युती करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरही त्यांनी अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरनाईकांनी पत्रं लिहिलं. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात काँग्रेस पडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस शिवाय पर्याय नाही
आम्ही राज्यात आम्ही वेगवेगळे आंदोलन करतोय. आम्ही ‘मोदी हटाव, देश बचाव’चा नारा देऊन काम करतोय. देशाला आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही. राहुल गांधी हे व्हिजन असलेलं नेतृत्व आहे, असंही त्यांनी सांगितलं. (MVA alliance for 5 years, we are with shiv sena: nana patole)
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 20 June 2021 https://t.co/QXg3iYNjRy #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2021
संबंधित बातम्या:
प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
होय, शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेचे गँग प्रमुखच, सुधीरभाऊ, नादाला लागू नका; गुलाबराव पाटलांचा इशारा
(MVA alliance for 5 years, we are with shiv sena: nana patole)