NCP Morcha : राजगुरूनगरात राष्ट्रवादीनं पोलीस स्टेशनपर्यंत काढला मोर्चा, शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध
खेड (Khed) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) वतीने राजगुरूनगर (Rajgurunagar) येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा कट केल्याबद्दल राजगुरूनगर शहरातून पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
पुणे : पुण्यातील खेड (Khed) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) वतीने राजगुरूनगर (Rajgurunagar) येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा कट केल्याबद्दल राजगुरूनगर शहरातून पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने निषेध आंदोलनामध्ये सामील झाले होते. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC) तासभर राडा केला. त्यांच्या घरावर हल्लाबोल केला. याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राजगुरूनगरात यावेळी आंदोलकांनी पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला.
काय म्हणाले शरद पवार?
आम्ही आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठी नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जे काही घडले त्यावर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नेता शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होणारच. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, असेही या हल्ल्यानंतर पवार म्हणाले होते.
#Pune : शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा कट केल्याबद्दल खेड तालुका राष्ट्रवादीनं राजगुरूनगरात निषेध मोर्चा काढला. @NCPspeaks @PawarSpeaks #agitation #NCP #Politics अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/P0Mr0332I7
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2022
एसटी कर्मचाऱ्यांकडून विरोध
एसटी कर्मचारी हातात दगड घेऊन आणि चपला घेऊन काल दिसून आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांना चोरांचे सम्राट म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी काल देत होते.