‘मी न्यूयॉर्कला गेलो, मला फोन आला…’, शरद पवार यांनी अमेरिकेतला अनोखा किस्सा सांगितला

"मी स्वत: बारामतीत शिकलो. माझे सर्वात चांगले शिक्षक होते ते कलंदर शेख. कलंदर मास्तर! त्यांनी आम्हाला प्रोत्साहीत केलं. शिक्षणासह सार्वजनिक कामात लक्ष द्यायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं", असं शरद पवारांनी सांगितलं.

'मी न्यूयॉर्कला गेलो, मला फोन आला...', शरद पवार यांनी अमेरिकेतला अनोखा किस्सा सांगितला
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:27 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. शरद पवार हे एकदा अमेरिकेत गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या संस्थेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थीनीचा फोन आला. या विद्यार्थीने जे संभाषण केलं त्याविषयीचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. त्या मुलीकडे स्वत:चं विमान होतं आणि ती शरद पवारांना घेण्यासाठी विमान पाठवण्याबद्दल बोलते. तिला विमान घेण्याइतपत यश मिळण्यामागे तिच्या शिक्षणाचा मोठा वाटा असल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं. एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचे आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

“आजची मुलं शिक्षणानंतर पुढे जाऊन काय करतील याचा नेम नाही. मी न्यूयॉर्कला गेलो. तिथे मला फोन आला. आमच्या घरी जेवायला या. मी विचारलं तुम्ही इथं कसं तर त्या मुलीने सांगितलं आम्ही इथे नोकरी करतो. मी म्हणालो अभिनंदन! ती म्हणाली घरी या. मी विचारलं कुठे राहतेस? तर म्हणाली शिकागो! मी म्हटलं इतक्या लांब? ती म्हटली आमचं विमान पाठवते. हे सगळं शिक्षणामुळे घडलं”, असं शरद पवार म्हणाले.

‘सुप्रिया सुळे 9 उत्तम शाळा चालवतात’

“शिक्षण आणि शिक्षणाचा विस्तार हा अनुकुल मार्ग आहे. बारामती शैक्षणिक केंद्र व्हावं ही माझी इच्छा होती. आता ते प्रत्यक्षात येतंय याचा आनंद आहे. राज्यात मी, अजितदादा, सुप्रिया आणि सहकारी शैक्षणिक क्षेत्रात लक्ष घालतो. त्याचा गाजावाजा करत नाही. सुप्रिया सुळे 9 उत्तम शाळा चालवतात. त्यात 2 आदिवासींसाठी. अजितदादाही यात लक्ष घालतात. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात 1 लाख विद्यार्थी शिकतात. याचा दर्जा कसा सुधारेल याचा ते प्रयत्न करतात”, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मी किती संस्थेत काम करतो, तर मला आठवत नव्हतं. रयतचा मी अध्यक्ष, जिथे 4 लाख विद्यार्थी. सहा ते साडेसहा लाख विद्यार्थी माझ्याशी संबंधित संस्थेत शिकतात. डोनेशन घ्यायचे नाही. जो प्रथम येईल त्याला प्राधान्य हे आमचं धोरण. आम्ही जे पैसे देतो ते शिक्षण निधी म्हणून देतो. त्याच्या व्याजातून शिकता येत नाही. त्यांना मदत करा. 50-50 टक्के रक्कम मुला-मुलींसाठी”, असं पवार म्हणाले.

“मी स्वत: बारामतीत शिकलो. माझे सर्वात चांगले शिक्षक होते ते कलंदर शेख. कलंदर मास्तर! त्यांनी आम्हाला प्रोत्साहीत केलं. शिक्षणासह सार्वजनिक कामात लक्ष द्यायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. बारामतीत सांस्कृतिक कार्यक्रमात कलंदर मास्तर असायचे. तुम्ही शिका, अभ्यास करा पण तिथेच थांबू नका. तुमच्या आवडत्या क्षेत्रात जा. तिथे यश मिळवा”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.

“राजकारणात लोक येतात. यशस्वी होतात, कधी अपयशी होतात. पण मी भाग्यवान. 1967 साली मी पहिल्यांदा उभा राहिलो. सगळ्या मोठ्या लोकांचा विरोध होता. पण लहान लोकांनी पाठींबा दिला. तेव्हापासून आजवर राजकारणात कधीही सुट्टी नाही. बारामती ही कर्तृत्ववान व्यक्तींची खाण. अशा व्यक्ती निवडून त्यांना झळाळी दिली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात पीए इनामदार यांचं नाव मोठं”, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.