News in Marathi : श्रीसदस्यांचा जीव जात असताना चांदीच्या ताटातून जेवणावळ्या?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

फुरसुंगी आणि देवाची उरुळी स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून घेतला आहे. महापालिकेत रहाणं केव्हाही चांगलं हे माझं मत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

News in Marathi : श्रीसदस्यांचा जीव जात असताना चांदीच्या ताटातून जेवणावळ्या?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 2:51 PM

पुणे : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत किती लोक दगावले याचा अजूनही सस्पेन्स कायम आहेत. सरकारी आकड्यानुसार या दुर्घटनेत 14 लोक दगावले आहेत. तर ठाकरे गटाच्या आरोपानुसार या दुर्घटनेत किमान 50 लोक दगावल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ अति भयानक असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही हे व्हिडीओ आणि फोटो भयानक असल्याचं सांगितलं आहे. ही दुर्घटना घडत असताना काही लोक चांदीच्या ताटात जेवताना दिसत आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते.

खारघरमध्ये जे घडलं त्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण सरकारने कार्यक्रम घेतला होता. खारघर दुर्घटनेत किती मृत्यूमुखी पडले याबाबतच्या आकड्यात तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी मी राज्यपालांकडे केली आहे. काहीजण आकडा सांगून मोकळे झाले आहेत. मला आकडा सांगायचा नाही. पण या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

न्यायालयीन चौकशी करा

या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही व्हिडीओ भयानक आहे. काही व्हिडीओ आणि फोटो भयानक आहेत. तर काही फोटोत चांदीच्या ताटात जेवताना दिसतायत. याला आयएएस अधिकारी जबाबदार आहेत का? कोणाच्या हट्टासाठी हे केलं गेलं? आम्ही माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी किती खर्च आलाय याची आम्ही माहिती मागवलीय. आतापर्यंतच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील सगळ्यात जास्त खर्च या कार्यक्रमात झालाय. यामधे सत्य काय आहे हे समोर आलं पाहिजे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

सरकार कुचकामी नसतं

दरम्यान, अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुठलंही सरकार कुचकामी नसतं. मराठा आरक्षणावर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला. पंरतु सुप्रीम कोर्ट अंतिम असते. त्यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. विविध संघटना आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन पुढचा मार्ग काढला पाहिजे, असं ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.