Video : “ताई काहीही करा, पण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका”, रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भावूक

रूपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदाचा राजिनामा दिला त्यावेळी अनेकजण भावूक झाले. अनेक महिला कार्यकर्यांनी त्यांना राजिनामा देऊ नका अशी विनंती केली.

Video : ताई काहीही करा, पण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका, रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भावूक
रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भावूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 2:59 PM

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी काल राष्ट्रवादीच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा दिला. त्याच्या राजिनाम्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “चाकणकर यांनी राजीनामा द्यायला नको होता”, असं राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांचं मत आहे. काल चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भावूक झाल्याचं पहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीला अश्रू अनावर झाले. “ताई काहीही करा, पण प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा देऊ नका”, असं म्हणत या कार्यकर्त्यीने रडत-रडत आपल्या नेत्याचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत केला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

“ताई राजीनामा देऊ नका”

रूपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा दिला. त्यावेळी अनेकजण भावूक झाले. अनेक महिला कार्यकर्यांनी त्यांना “राजीनामा देऊ नका”, अशी विनंती केली. “ताई तुम्ही काहीही करा, पण तुम्ही राजिनामा देऊ नका. तुम्ही आमच्या नेत्या आहात. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडतं. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नका”, अशी या महिला कार्यकर्त्यांनी गळ घातली. पण चाकणकर आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा दिला.

रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष पदही रिकामे झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं. आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळलं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. आता त्यांच्यावर राज्य महिला आयोगाची भिस्त असणार आहे.

संबंधित बातम्या

सुडाच्या भावनेनं कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल, Sanjay Raut यांचा भाजपवर टोला 

Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही

Munde’s love story | करुणा-धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार; 6 मुले, अनेक बायका लपवल्या, भाभीजींचा हल्लाबोल!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.