‘अश्लील व्हिडीओ करुन वर्षभर अत्याचार, पुरावे असूनही तपास नाही, शरद पवारांची भीती दाखवून धमकावले’

या नव्या आरोपांमुळे महाविकासाघाडी सरकारच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. | Rajesh Vitekar NCP Rape

'अश्लील व्हिडीओ करुन वर्षभर अत्याचार, पुरावे असूनही तपास नाही, शरद पवारांची भीती दाखवून धमकावले'
राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले.
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 1:22 PM

पुणे: परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे. (Women allegations on NCP Leader Rajesh Vitekar )

या महिलेने गुरुवारी पुण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकारपरिषद घेऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या आरोपांमुळे महाविकासाघाडी सरकारच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली होती. तर संजय राठोड प्रकरणही सरकारच्या अंगाशी आले होते. अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोण आहेत राजेश विटेकर?

39 वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक शिवसेना उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव 4 लाख 96 हजार 742 मतं मिळवत विटेकर दुसऱ्या क्रमांकावर 5.3 कोटी रुपयांची संपत्ती, तर 8.7 लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख राजेश विटेकर पदवीधर असून शेती व्यवसाय असल्याचाही उल्लेख

संबंधित बातम्या :

मी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेते, कारण… : रेणू शर्मा

संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?; भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!

मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप, औरंगाबाद पोलिसांकडून सलग 6 तास चौकशी

(Women allegations on NCP Leader Rajesh Vitekar )

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.