Pune crime : ‘ही तर विकृती, आता ती जेलमध्येच दाखवा’, बदनामी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रुपाली पाटलांचं उत्तर

पूनम गुंजाळ यांना एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉइन होण्यासाठी फिर्यादीना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्या ग्रुपच्या प्रोफाइलवर रूपाली पाटील यांचा विना परवानगी फोटो घेऊन वापर होत होता. त्यासोबतच अश्लील भाषेत खिल्ली उडवत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तक्रार करण्यात आली.

Pune crime : 'ही तर विकृती, आता ती जेलमध्येच दाखवा', बदनामी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रुपाली पाटलांचं उत्तर
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 5:17 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil) यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. फेसबुकवर (Facebook) एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषा तसेच शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अॅडव्होकेट पूनम काशिनाथ गुंजाळ (वय 27) यांनी तक्रार दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते असलेले सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही विकृती असून आता ती जेलमध्ये जाऊन दाखवावी, असे म्हटले आहे.

विनंती करूनही अश्लील भाषा

पूनम गुंजाळ यांना एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉइन होण्यासाठी फिर्यादीना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फिर्यादी यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपच्या प्रोफाइलवर रूपाली पाटील ठोंबरे यांचा फोटो दिसला. विना परवानगी त्यांचा फोटो घेऊन त्याचा वापर होत होता. त्यासोबतच अश्लील भाषेत खिल्ली उडवत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी महिलेविषयी अशा भाषेत बोलू नका, अशी विनंती केली. मात्र त्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने पर्सनल फेसबुक अकाउंटवरून रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली.

डिसेंबरमध्ये सोडला होता पक्ष

फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत. तर याप्रकरणी रुपाली पाटील यांनी याचा निषेध केला असून ही विकृती आहे. ही विकृती त्यांनी जेलमध्ये दाखवावी. सोशल मीडियावर महिलांची बदनामी करणाऱ्यांना पोलीस धडा शिकवतील, असे म्हटले आहे. 2021मध्ये रुपाली पाटील यांनी मनसेतील अंतर्गत वादामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. याचवरून मनसेतील काही कार्यकर्त्यांनी त्यांना अशाप्रकारे भाषा वापरल्याचे दिसून येत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.