Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या अगाध ज्ञानाचं कौतुक वाटतं; शरद पवार यांनी लगावला टोला

पुण्यात महात्मा गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताहाची सुरुवात एका कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, कुमार सप्तर्षी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी राज्यातील गैर काँग्रेस सरकारमध्ये कुमार सप्तर्षी होते याची आठवण सांगितली.

मोदींच्या अगाध ज्ञानाचं कौतुक वाटतं; शरद पवार यांनी लगावला टोला
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 8:35 PM

मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता, मात्र त्यानंतर अनेक ठिकाणी वातावरण पेटलं होते. त्यावेळी आम्ही तरुणांची समजूत काढण्याचा प्रयन्त केला,शेवटी तो निर्णय मला स्थगित करावा लागला,मात्र व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्यासाठी मोठा झटका होता. त्यानंतर मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर महाविद्यालयात गेलो विद्यार्थ्यांशी संवाद साधला,त्यानंतर नावात बदल करून हा नामांतराचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी अनेकांनी मला साथ दिली असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले. पुण्यात महात्मा गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताहाची सुरुवात एका कार्यक्रमात झाली त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की महात्मा गांधींचे विचार आज जगात स्वीकाराले गेले आहेत. महात्मा गांधींनी जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली,मात्र आपल्या पंतप्रधानांनी कुठेतरी भाषणात म्हटलं होतं की गांधी चित्रपटामुळे महात्मा गांधीचे नाव जगात प्रसिद्ध झाले, मला गंमत वाटते,आपल्या पंतप्रधानांच्या अगाध ज्ञानाचे मी कौतुक करतो अशा शब्दात शरद पवारांनी यावेळी पंतप्रधानांवर टीका केली.

हे सुद्धा वाचा

कोथरुडला मिनी पाकिस्तान करायचाय

कुमार सप्तर्षी आपल्या भाषणात म्हणाले की यांना कोथरूडला मिनी पाकिस्तान करायचा आहे. कोथरूडमध्ये कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला फ्लॅट मिळत नाही. मिळालाच तर त्याला आजूबाजूची लोकं त्याला हाकलून देतात. कोथरूडमध्ये गांधी भवन असल्याने कोथरूड मधील नेता चंपा यांनी दहा एकर जागेवर पाडकाम केले. महानगरपालिकेच्या आयुक्तांना विश्वासात न घेता पाडकाम केले, बरं झालं त्यांचं पालकमंत्री पद गेलं असेही कुमार सप्तर्षी यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की अजित पवार फुटून सरकारमध्ये गेल्याचं वाईट वाटतं. पण बरं झालं ते पालकमंत्री झाले आणि पाटील यांच्याकडून पालकमंत्री पद काढून घेण्यात आलं. शरद पवार यांना तुम्ही काही बोलू शकता. पण जातीयवादी बोलू शकत नाही. ते कधीच जातीवादी होऊ शकत नाहीत. आम्हाला कधीच जात नको होती. जातीयवादाच्यावर जाऊन त्यांनी भीष्माचार्याचा रोल पार पाडला. आम्ही त्यांच्या कायम पाठीशी उभे राहू असेही कुमार सप्तर्षी यावेळी म्हणाले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.