शरद पवार यांनाही पडली इंदोरीकरांची भुरळ, व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल
कीर्तनकार इंदुरीकरांच्या स्टाईलची खुद्द शरद पवारांनाही भुरळ पडली. कीर्तनावेळी इंदुरीकर जसे हातवारे करतात. त्याचीच नक्कल पवारांनी केली त्यावेळी आणि इंदुरीकरांनाही हसू आवरलं नाही.
पुणे : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या स्टाईलची भुरळ चक्क शरद पवारांना पडलीय. पुण्यात एक पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम होता. यावेळी पवारांच्या हस्ते इंदोरीकरांसहीत अनेकांना सन्मान झाला. यावेळी शरद पवार इंदोरीकरांच्या स्टाईलबद्दल बोलले. त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट
कीर्तनकार इंदुरीकरांच्या स्टाईलची खुद्द शरद पवारांनाही भुरळ पडली. कीर्तनावेळी इंदुरीकर जसे हातवारे करतात. त्याचीच नक्कल पवारांनी केली त्यावेळी आणि इंदुरीकरांनाही हसू आवरलं नाही. कीर्तनात इंदुरीकर राजकारणावर सडेतोड भाष्य करतात.
जेव्हा एखाद्या राजकीय नेत्यांकडून त्यांचा सत्कार होतो, तेव्हा नेतेही इंदुरीकरांपासून लांब राहतात. 2019 मध्ये नगरच्या कार्यक्रमात फडणवीसांनी कोपरापासून इंदुरीकरांना नमस्कार केला होता. त्यानंतर पवारांनी इंदुरीकरांच्या स्टाईलची आठवण करुन दिली.
इंदुरीकरांइतकं लोकप्रिय राहणं. कीर्तनातून राजकारणावर भीडबाड न बाळगता सडेतोड बोलणं आणि तरीही सर्व बड्या नेत्यांशी चांगले संबंध असणं हे इंदुरीकरांनाच जमलंय. नेत्यांचं कौतुक करण्याची वेळ आलीच तरी इंदुरीकर त्यात सर्वांना सामावूनही घेतात.
मागच्या काही दिवसात काही घटना घडल्या. तेव्हा काही वारकरी देखील दोन गटात विभागले गेले होते पण इंदुरीकर सगळीकडे असतात. कधी परळीतल्या नाथ फेस्टिव्हलला त्यांचं कीर्तन असतं, तर कधी बारामतीत…आपण सर्व पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचं इंदुरीकर स्वतः गमतीनं म्हणतात.