सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची कार्यकर्त्यांची मागणी; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, मी काय…
NCP Leader Supriya Sule on Sunetra Pawar : सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत. यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलंय. त्या नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची काटेवाडीतील कार्यकर्ते मागणी करणार आहेत. परिपत्रक काढून सह्यांची मोहीम काटेवाडीतील कार्यकर्ते ते पत्र अजित पवारांना देणार आहेत. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात राज्यमंत्री पद मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अजित पवारांचे मूळ गाव असलेल्या काटेडीतील कार्यकर्ते ही मागणी करणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ काटेवाडी गावातील सरपंच व ग्रामस्थ एकवटले. यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभा देण्याचा प्रश्न हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी काय बोलणार?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळ गावी काटेवाडीत ग्रामस्थांकडून एक मागणी केली जात आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी सरपंच आणि ग्रामस्थानी एकमताने केली आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती आणि पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवायचं की काय करायचं हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. ते ठरवतील कुणाला करायचे ते… त्यावर मी काय बोलू?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुण्यातील नालेसफाईवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
पुण्यातील नालेसफाईच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. घाई घाईत केलेल्या विकासामध्ये चुका झाल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प फसला आहे. पुणेकर टॅक्स भरतात, मग नालेसफाई का नाही झाली? नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका. यासंदर्भात एसआयटी स्थापन करून चौकशी करा. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. आयुक्तांनी काही उपाययोजना केल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
ससून रुग्णालयाचं नाव बदनाम केलं जात आहे. याला राज्य सरकार आणि पुणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे. पैसे जातात कुठे याची चौकशी झाली पाहिजे. नरेटिव्ह कसं सेट केलं जाऊ शकतं. आमच्याकडे डेटा आहे. कंपन्या बाहेर जात आहे. सुप्रिया सुळे इमानदार आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.