Pune Election | सुप्रिया सुळे म्हणाल्या यंदा महापौर राष्ट्रवादीचाच, शुभेच्छा देत मोहळ यांची सडकून टीका, मांडला पूर्ण इतिहास

| Updated on: Oct 31, 2021 | 5:45 PM

प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय. तसेच राष्ट्रवादीने असं काय केलंय की, जनता आम्हाला बाजूला करेल असा सवालदेखील विचारलाय.

Pune Election | सुप्रिया सुळे म्हणाल्या यंदा महापौर राष्ट्रवादीचाच, शुभेच्छा देत मोहळ यांची सडकून टीका, मांडला पूर्ण इतिहास
SUPRIYA SULE AND MURLIDHAR MOHOL
Follow us on

पुणे : पुण्यात महानगपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय. तसेच राष्ट्रवादीने असं काय केलंय की, जनता आम्हाला बाजूला करेल असा सवालदेखील विचारलाय.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले ?

पुण्यात सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सत्ताबदलासाठी तयारीला लागा. पुढचा महापौर आपल्याच पक्षाचा होईल असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. त्यानंतर मोहोळ यांनी सुळे यांना काही प्रश्न केले आहेत. “राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा आहेत. यांनी गेली 15 वर्षे शहराच्या विकासासाठी काय केलं. राष्ट्रवादीने असं काय केलं की, पुणेकर आम्हाला बाजूला करून त्यांना संधी देतील,” असं मोहोळ यांनी विचारलंय.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले. “पत्रकार सांगतात पुण्यात लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं पण महापौरांनी चांगल काम केलं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल असं लोक सांगतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काम करून घ्या. निवडणूकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचा असेल,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच प्रचार सुरू करा मात्र तीन नियम पाळा.आयोजकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळले पाहिजेत. अजित पवार यांनी पुण्यात काम केलं त्यामुळे कोरोना कमी झाला. दादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. यावेळी महापौर राष्ट्रवादीचा होणार, असेदेखील सुळे म्हणाल्या.

प्रत्येक पक्ष म्हणतो यंदा सत्ता आमचीच

दरम्यान, पुणे महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच भाजप आणि काँग्रेसच पक्षाचे नेते यावेळी महापौर आमचाच होईल असे ठणकावून सांगत आहेत. सध्या पुण्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आमच्या कामाची पोचपावती म्हणून जनता यावेळीदेखील आम्हालाच संधी देईल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जातोय. तर लोक भाजपला कंटाळले आहेत. यावेळी सत्ताबदल होणार असून आमचाच महापौर असेल असा दावा इतर पक्षाकडून केला जातोय.

इतर बातम्या :

आर्यन खानपाठोपाठ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाचीही तुरुंगातून सुटका; अरबाजचे वडील म्हणतात…

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं?

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विटरवरुन माहिती